Tata Punch : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक शक्तिशाली सुरक्षित कार भारतात लाँच करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटा मोटर्स आगामी काळात त्यांच्या आणखी शक्तिशाली कार लाँच करणार आहे.
टाटा मोटर्स त्यांच्या कार तयार करत असताना जबदस्त सुरक्षा फीचर्स देत आहे. तसेच कारची बिल्ड गुणवत्ता देखील इतर कारपेक्षा सर्वोत्तम असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. टाटा मोटर्स कमी किमतीत त्यांच्या शानदार कार सादर करत आहे.
टाटा मोटर्सची पंच कार सुरक्षेच्या बाबतीत उत्तम असल्याचे दिसून आले आहे. पंच कारला ग्लोबल NCAP चाचणीमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. कमी बजेट ग्राहकांसाठी टाटाची पंच एसयूव्ही कार उत्तम कार आहे.
पंच एसयूव्ही किंमत
टाटा मोटर्सच्या पंच एसयूव्ही कारची किंमत देखील कमी ठेवण्यात आली आहे. पंच एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.10 लाख रुपये आहे. तुमच्या छोट्या फॅमिलीसाठी पंच 5 सीटर कार उत्तम पर्याय आहे.
पंच व्हेरियंट आणि फीचर्स
पंच कार ९ रंग पर्यायामध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच कार 33 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे.
पंच एसयूव्ही कारमध्ये हरमनची इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लेदर रॅप्ड फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, सिटी आणि इको ड्राइव्ह मोड, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
पंच एसयूव्ही कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 2 एअरबॅग्ज, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, चाइल्ड लॉक, एबीएस, ईबीडी, रिअर पार्किंग सेन्सर असे मानक फीचर्स दिले गेले आहेत. पंच एक जबरदस्त सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली दमदार एसयूव्ही कार आहे.
पंच मायलेज आणि इंजिन
पंच कारमध्ये 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड 3 सिलेंडर रेवेट्रॉन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कारचे पेट्रोल व्हेरियंट 20 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर सीएनजी व्हेरियंट 27 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.