Tata Upcoming Car : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये SUV कार्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरुणांमध्ये एसयुव्हीची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांनी आता SUV गाडीच्या प्रोडक्शनवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आघाडीच्या ऑटो कंपन्यांनी गेल्या काही वर्षाच्या कालावधीत अनेक नवीन SUV कार्स लॉन्च केल्या आहेत.
दरम्यान जर तुम्हीही आगामी काळात नवीन एसयुव्ही खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक कामाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही महिन्यांनी भारतीय कार मार्केटमध्ये 2 नवीन एसयुव्ही कार लॉन्च होणार आहेत.
या सेगमेंटची वाढती मागणी पाहून टाटा अन ह्युंदाई कंपन्या त्यांच्या 2 नवीन SUV लाँच करणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहेत. अशा परिस्थितीत आता आपण या 2 आगामी मध्यम आकाराच्या SUV ची संभाव्य फिचर्स, पॉवरट्रेन आणि विक्री याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
ह्युंदाई अल्काझार फेसलिफ्ट : हुंदाई ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. मारुती सुझुकी नंतर या कंपनीचा नंबर लागतो. मिळालेल्या माहितीनुसार ही आघाडीची कार उत्पादक कंपनी हुंडई क्रेटा फेसलिफ्टच्या अपार यशानंतर आता आपली पॉपुलर एसयूवी अल्काझारचे अपडेटेड वर्जन भारतीय बाजारात उतरवणार आहे.
येत्या काही महिन्यांनी ही गाडी लॉन्च होणार अशी शक्यता वर्तवली जात असून अपकमिंग हुंडई अल्काझार फेसलिफ्टमध्ये काही मोठे बदलही पाहायला मिळू शकतात. ही गाडी सप्टेंबर महिन्यामध्ये लॉन्च होणार असा अंदाज आहे.
अपकमिंग अपडेटेड अल्काजार फेसलिफ्ट फीचर्स म्हणून 10.25-इंचचे टचस्क्रीन इन्फोटेन सिस्टम, एंड्राइड एंड ऑटो ऍपल कारप्ले कनेक्टिविटी, डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोलसह लेवल-2 ADAS टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.
Tata Curvv ICE : टाटा कंपनीने नुकताच काही दिवसांपूर्वी टाटा कर्व इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा बोलबाला आहे. या सेगमेंटमध्ये कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. दरम्यान आता या सेगमेंटवर आपली पकड आणखी मजबूत व्हावी यासाठी कंपनीने कर्व इलेक्ट्रिक लाँच केली आहे.
टाटा कर्व इलेक्ट्रिक 7 ऑगस्टला भारतात लॉन्च करण्यात आली आहे. विशेष बाब अशी की आता या गाडीचे ICE वेरिएंट देखील लवकरच लॉन्च केले जाणार आहे. याची तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आली आहे. या गाडीचे आधी इलेक्ट्रिक वर्जन लॉन्च करणारा असा निर्णय कंपनीने घेतला होता अन मग ICE वर्जन लॉन्च केले जाणार होते.
यानुसार आता टाटा कंपनीचे हे ICE वर्जन 2 सप्टेंबर ला लॉन्च होणार अशी माहिती कंपनीकडून समोर आली आहे. अपकमिंग टाटा कर्व मध्ये पावरट्रेन म्हणून 1.2-लीटर का पेट्रोल इंजिन, 1.2-लीटरचे टर्बो-जीडीआय पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटरचे टर्बो डीजल इंजिन दिले जाणार आहे. तथापि, अपकमिंग टाटा कर्वची किंमत काय राहणार? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.