Tata Upcoming Car : टाटा मोटर्स ही भारतातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. दरम्यान टाटा कंपनीची कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
विशेषता ज्यांना टाटा कंपनीची इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की, कंपनीच्या माध्यमातून लवकरच दोन नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत.
या चालू वर्षात कंपनी दोन नवीन इलेक्ट्रिक एसयुव्ही लॉन्च करणार अशी बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया कंपनीकडून कोणत्या दोन नवीन इलेक्ट्रिक SUV कार लॉन्च केल्या जाणार आहेत.
Curvv EV : मिळालेल्या माहितीनुसार टाटा कंपनी लवकरच ही इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कार जुलै-सप्टेंबर 2024 मध्ये लॉन्च होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये करण्यात आला आहे.
याच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, या मॉडेलचे एक्सटीरियर हुबेहूब भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये सादर केलेल्या मॉडेलसारखेच राहणार आहे. पण या नव्याने लॉन्च होणाऱ्या एसयूव्हीचे इंटीरियरमध्ये काही महत्त्वाचे बदल होतील अशी आशा आहे.
या बदलांमुळे ही गाडी नेक्सॉन फेसलिफ्टच्या प्रीमियम आवृत्तीसारखी दिसेल असे बोलले जात आहे. खरे तर मारुती सुझुकी ही देशातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी आहे. ही गोष्ट खरी आहे मात्र इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये टाटा मोटर्सचा बोलबाला आहे.
दरम्यान कंपनीने आपला इलेक्ट्रिक सेगमेंट आणखी मजबूत करण्यासाठी ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात लवकरच लॉन्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कंपनीने या EV च्या बॅटरीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र याची बॅटरी Nexon EV च्या बॅटरी पॅकपेक्षा थोडी मोठी असेल असे मानले जात आहे. टाटा म्हणतेय की कर्व्ह ईव्ही ग्राहकांना 500 किमी पर्यंतची रेंज देऊ शकणार आहे. या कारमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
हॅरियर EV : कंपनी Curvv EV आणि हॅरियर EV या इलेक्ट्रिक कार यंदा भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. या वर्षाच्या अखेरीस Harrier EV ही SUV लाँच होणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात असेल. ही कार जवळपास 25 लाख रुपयाच्या किमतीत भारतीय बाजारात लॉन्च होऊ शकते.
या बाजारात नव्याने लॉन्च होणाऱ्या इलेक्ट्रिक कारचे बहुतेक फिचर्स हॅरियर फेसलिफ्ट सारखेच राहतील असे बोलले जात आहे. ही गाडी देखील एकदा चार्ज केली की 500 km पर्यंत धावण्यास सक्षम राहणार असा दावा होत आहे.