ऑटोमोबाईल

Tata Upcoming Cars In India : टाटा 2024 मध्ये लॉन्च करणार 3 स्टायलिश कार, Nexon CNG सह EV कारचा समावेश

Tata Upcoming Cars In India : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो क्षेत्रातील पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी नवनवीन कार लॉन्च करणार आहे. टाटाकडून सध्या EV सेगमेंट मजबूत करण्यासाठी भर दिल्याचे दिसत आहे. अलीकडेच टाटाने त्यांची पंच EV कार लॉन्च केली आहे.

टाटा मोटर्सने 2023 च्या शेवटी त्यांच्या अनेक नवीन कार लॉन्च केल्या आहेत. आता आगामी काळात टाटा त्यांच्या आणखी नवीन स्टायलिश कार लॉन्च करणार आहे. टाटाकडून CNG सेगमेंट मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Tata Nexon iCNG

टाटा मोटर्सची लोकप्रिय Nexon आता EV, पेट्रोल आणि डिझेलनंतर आता CNG सेगमेंटमध्ये देखील अवतरणार आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024 Nexon iCNG सादर करण्यात आली आहे.

Nexon iCNG ही देशातील पहिली टर्बोचार्ज केलेली CNG कार असणार आहे. Nexon CNG एसयूव्ही कारमध्ये 1.2-लिटर तीन-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले जाईल.

कारचे इंजिन 118 bhp पॉवर आणि 170 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड AMT किंवा नवीन 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशनशी जोडण्यात येण्याची अपेक्षा आहे.

Tata Curvv

टाटा मोटर्सकडून त्यांची नवीन Curvv स्टायलिश एसयूव्ही कार भारतात यावर्षी लॉन्च केली जाणार आहे. ही कार पेट्रोल, डिझेल आणि EV सेगमेंटमध्ये सादर केली जाणार आहे. सर्वात प्रथम Curvv एसयूव्ही कार EV सेगमेंटमध्ये लॉन्च केली जाणार आहे.

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये सादर करण्यात आली आहे. Curvv EV कार पंच EV च्याच प्लॅटफॉर्मवर बनवली जाईल. ही कार 500 किमी रेंज देण्यास सक्षम असेल. तसेच त्यानंतर Curvv कार ICE व्हेरियंटमध्ये लाँच केली जाईल.

अल्टोझ रेसर

टाटा मोटर्सकडून त्यांच्या हॅचबॅक कार अल्टोझचे नवीन रेसर एडिशन लॉन्च केले जाणार आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये अल्टोझ रेसर कार सादर करण्यात आली होती.

कारचे स्पोर्टी डिझाईन असलेले हे एडिशन आता ग्राहकांना लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. कारमध्ये नवीन फीचर्स दिले जाणार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts