ऑटोमोबाईल

Tata Upcoming EV Cars : टाटाचा धमाका सुरूच ! एकापाठोपाठ लॉन्च करणार या 4 स्टायलिश EV कार, पहा यादी

Tata Upcoming EV Cars : टाटा मोटर्सकडून देशात त्यांच्या अनेक दमदार रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. टाटा मोटर्सकडून आतापर्यंत त्यांच्या चार EV कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. टाटाच्या इलेक्ट्रिक कारच्या किमती देखील कमी आहेत.

टाटा मोटर्सकडून Nexon EV, Tigor EV, Tiago EV आणि पंच EV या चार कार भारतात लॉन्च केल्या आहेत. आता टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता त्यांच्या आणखी चार नवीन EV कार भारतात लॉन्च केल्या जाणार आहेत.

टाटा मोटर्सचे सध्या इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच इलेक्ट्रिक कार सेगमेंटम आणखी मजबूत करण्यासाठी नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

Curvv EV

टाटा मोटर्सकडून त्यांची नवीन संकल्पनेवर आधारित Curvv EV यावर्षी भारतात लॉन्च केली जाणार आहे. टाटा मोटर्सची ही EV कार Nexon EV पेक्षा देखील महाग असेल. तसेच Nexon EV पेक्षा जास्त रेंज देणारी Curvv EV आकर्षक आणि स्टायलिश असेल. टाटाची ही कार आगामी Hyundai Creta EV शी स्पर्धा करेल.

हॅरियर ईव्ही

टाटा मोटर्सकडून हॅरियर फेसलिफ्ट एसयूव्ही कारनंतर आता हॅरियर EV कार लॉन्च केली जाणार आहे. टाटाने त्यांची Harrier EV 2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये सादर केली होती. या कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक आणि लक्झरी फीचर्स दिले जाणार आहेत. 2024 च्या शेवटी टाटाकडून हॅरियर ईव्ही लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.

Sierra EV आणि Altroz ​​EV

टाटा मोटर्स त्यांच्या नवनवीन EV कार लॉन्च करण्यावर अधिक भर देत आहे. टाटाकडून 2025 मध्ये त्यांच्या आणखी दोन नवीन EV कार लॉन्च करणार आहे. Sierra EV आणि Altroz ​​EV अशा या दोन कार असतील. या दोन्ही कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक पाहायला मिळेल.

टाटाकडून त्यांच्या आगामी कारमध्ये 500 किमी रेंज देणारे बॅटरी पॅक दिले जाणार असल्याची माहिती दिली आहे. Altroz कारचे आता रेसर एडिशन लॉन्च होणार असून त्यानंतर Altroz चे EV व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts