Tata Upcoming SUV Car : नजीकच्या भविष्यात नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आगामी काळात भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा नवीन मॉडेल लाँच करणार आहे. खरेतर गेल्या काही वर्षांपासून भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही सेगमेंटच्या मागणीत कमालीची वाढ झाली असल्याचे दिसत आहे.
2024 च्या पहिल्या सहामाहीत म्हणजे जानेवारी ते जून 2024 या काळात भारतीय बाजारपेठेतील एकूण कार विक्रीपैकी 52 टक्के वाटा हा एकट्या SUV विभागाचा होता. यावरून भारतात एसयुव्ही गाड्यांना अधिक मागणी असल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान हीच मागणी लक्षात घेता आता आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा भारतीय कार मार्केटमध्ये चार नवीन एसयुव्ही कार लॉन्च करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण टाटा कंपनीच्या या अपकमिंग SUV गाड्यांबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Tata Punch Facelift : टाटा कंपनीच्या अनेक कार्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये टाटा पंच या गाडीचा देखील समावेश होतो. टाटा पंच ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणून ओळखली जात आहे. वर्ष 2024 मध्ये, टाटा पंचने अनेक वेळा देशातील सर्वाधिक विक्रीच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे हे विशेष.
या गाडीची भारतातील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांमध्ये मोठी मागणी पाहायला मिळते. ग्राहकांकडून या गाडीला मोठ्या प्रमाणात पसंती दाखवली जात आहे. दरम्यान, या गाडीची लोकप्रियता पाहता आता कंपनी टाटा पंचचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे.
यासाठी कंपनीकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सूरु आहेत. या फेसलिफ्ट टाटा पंचमध्ये अनेक मूलभूत बदल केले जाणार आहेत. सध्याच्या मॉडेल पेक्षा या आगामी मॉडेलच्या इंटेरियर मध्ये आणि एक्सटेरियर मध्ये अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतील.
Tata Nexon : ही टाटा मोटर्सची आणखी एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. ही गाडी देशातील ग्रामीण तसेच शहरी भागातही लोकप्रिय बनली आहे. ही गाडी सहजतेने रस्त्यावर नजरेस पडते. आता याच नेक्सॉनचे सीएनजी व्हेरियंट लॉन्च केले जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी 2024 च्या अखेरीस टाटा नेक्सॉन सीएनजी लॉन्च करणार आहे. खरेतर ग्राहक Tata Nexon CNG कधीपर्यंत लॉन्च करणार हा सवाल उपस्थित करत होते. अखेरकार आता ही गाडी या चालू वर्षाच्या अखेरीस भारतीय कार मार्केटमध्ये दाखल होणार असे बोलले जात आहे.
Tata Curvv ICE : नुकत्याच काही दिवसांपूर्वी टाटा कंपनीने Curvv EV लॉन्च केली आहे. आता कंपनी या गाडीचे आयसीई मॉडेल लॉन्च करणार आहे. खरंतर, कंपन्या आधी आयसीई मॉडेल लॉन्च करतात मग इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च केले जाते. मात्र टाटाने Curvv च्या बाबतीत असे केले नाही. आधी या गाडीचे इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च केले आणि त्यानंतर ICE मॉडेल लाँच केले.