Tata Cars Discount : टाटा कंपनी आपल्या वाहनांच्या विक्रमी विक्रीचा उत्सव साजरा करत आहे. विक्रीतील या यशानंतर कंपनी ग्राहकांना रिटर्न गिफ्ट म्हणून वाहनांच्या खरेदीवर भरघोस सूट देत आहे. टाटा मोटर्स, 20 लाख एसयूव्ही वाहनांच्या विक्रीचा आनंद साजरा करताना, ग्राहकांना त्यांच्या वाहनांवर 10,000 ते 1.4 लाख रुपयांपर्यंत आकर्षक सूट देत आहे.
यावेळी, जर तुम्ही स्वतःसाठी बजेट फ्रेंडली चारचाकी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर टाटा मोटर्सने ऑफर केलेली डिस्काउंट ऑफर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटाच्या वाहनांच्या विक्रीला वेग आला आहे. ज्यामध्ये Tata Nexon ने गेल्या सलग तीन वर्षांपासून सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा किताब पटकावला आहे. टाटा पंचालाही बाजारात मोठी मागणी आहे.
Tata Tiago EV वर सूट
या महिन्यात, टाटाच्या Tiago EV वर कमाल 50,000 रुपयांची सूट दिली जात आहे. ही सूट फक्त XT LR वेरिएंटवर दिली जात आहे, तर टाटाच्या Tiago EV च्या इतर व्हेरियंटवर ही सूट 10,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान दिली जात आहे.
तर टाटा सफारी एमटी मॉडेलवर 50,000 ते 1.4 लाख आणि मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज असलेल्या टाटा हॅरियरच्या निवडक प्रकारांवर 50,000 ते 1.2 लाखांपर्यंत सूट दली जात आहे.
कपंनी इलेक्ट्रिक वाहनांवर देखील सूट देत आहे. ज्या अंतर्गत Tata Nexon EV च्या व्हेरियंटवर 50,000 रुपयांपासून ते 1.3 लाख रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. त्याच वेळी, Tata Nexon EV च्या बेस क्रिएटिव्ह प्लस एमआर व्हेरियंटवर कोणत्याही प्रकारची सूट दिली जात नाही.
डिस्काउंट ऑफर अंतर्गत, टाटा कंपनी इलेक्ट्रिक पंचवर जास्तीत जास्त 30,000 रुपयांची सूट देत आहे. या सवलती इलेक्ट्रिक पंच – ॲडव्हेंचर एलआर, ॲडव्हेंचर एस एलआर, एम्पॉवर्ड एलआर आणि एम्पॉवर्ड एस एलआर सोबत एम्पॉवर्ड प्लस एलआर, एम्पॉवर्ड प्लस एस एलआरच्या फास्ट-चार्जिंग सुसज्ज प्रकारांवर उपलब्ध आहेत.