Tata King Of SUV Festival : भारतीय बाजारपेठेतील टाटा मोटर्सच्या एसयूव्ही वाहनांना मोठी मागणी आहे. यामुळेच टाटाच्या स्पोर्ट्स युटिलिटी वाहनांच्या विक्रीत २० लाखांनी वाढ झाली आहे आणि कंपनीला यशाच्या दिशेने नेत आहे. हे मोठे यश साजरे करण्यासाठी टाटा मोटर्स ‘किंग ऑफ एसयूव्ही’ महोत्सवाचे आयोजन करत आहे. ही ऑफर केवळ 31 जुलैपर्यंत केलेल्या SUV च्या बुकिंगसाठी वैध आहे.
ग्राहकांना अधिकाधिक विक्री करण्यास प्रोत्साहित करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. ज्यामध्ये कंपनी आपल्या SUV रेंजमध्ये समाविष्ट असलेल्या निवडक वाहनांवर विशेष सूट देत आहे. कोणत्या वाहनांवर किती सुरु देत आहे, पाहूया…
टाटा मोटर्सने ऑफर केलेल्या मर्यादित कालावधीच्या ऑफर अंतर्गत, कंपनी आपल्या लोकप्रिय SUVs Tata Harrier आणि Safari वर मोठ्या सवलती देत आहे. या दोन्ही वाहनांवर कंपनी 1.4 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. त्यानंतर या दोन्ही वाहनांना पूर्वीच्या तुलनेत 50,000 आणि 70,000 रुपयांच्या बचतीचा लाभ मिळत आहे, या ऑफर अंतर्गत, हॅरियर आता 14.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल, तर टाटा सफारीची सुरुवातीची किंमत आता 15.49 लाख झाला आहे.
31 जुलैपर्यंत असलेल्या या ऑफरमध्ये, टाटा मोटर्स लोकप्रिय कार Tata Nexon EV आणि Tata Punch EV सोबत इलेक्ट्रिक लाइन अप आणि इतर वाहनांवरही अनेक उत्तम ऑफर देत आहे.
कपंनी Tata Nexon EV वर 1.3 लाख रुपयांची सूट देत आहे, तर दुसरीकडे सर्वाधिक विक्री होणाऱ्या पंच EV वर 30,000 रुपयांचा फायदा मिळत आहे.