Tata Curvv : लोकप्रिय देशांतर्गत कार उत्पादक टाटा मोटर्सने आपल्या बहुप्रतिक्षित कर्व्ह कूप एसयूव्हीची प्रतीक्षा संपवली आहे. ही कार लवकरच मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. नवीन Tata Curvv कार 7 ऑगस्टला लाँच होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Tata Curvv SUV डिझेल-पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह ऑफर केली जाईल.
ही कार एक 5 सीटर असेल. Tata Curvv कारची चाचणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. अहवालानुसार, Tata Curve कार 7 ऑगस्ट रोजी लॉन्च केली जाईल आणि त्या दिवशी Tata Curve IC इंजिन आणि इलेक्ट्रिक मॉडेल दोन्ही सादर केले जातील.
Tata Curvv च्या ICE आणि इलेक्ट्रिक मॉडेल्सच्या किमती अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. नवीन Curvv नेक्सॉन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. याला कूप सनरूफ डिझाईन देण्यात आले आहे, ज्यामुळे ते आकर्षक बनते.
वैशिष्ट्ये
Tata Curve ला सनरूफ, पॅडल शिफ्टर्स, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 2 स्पोक स्टीयरिंग व्हील अशी अनेक वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे.
या सर्वांशिवाय, ADAS सुरक्षा पॅकेज देखील प्रदान करणे अपेक्षित आहे. तसेच कारमध्ये आकर्षक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. Tata Curve 2023 ऑटो एक्स्पोमध्ये 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह संकल्पना स्वरूपात प्रदर्शित करण्यात आली होती.
पॉवरट्रेन
Tata Curve च्या IC इंजिन मॉडेलमध्ये 1.2-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिनचा पर्याय दिला जाऊ शकतो. या इंजिनसोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ऑफ ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध असेल.
कर्व्हच्या इलेक्ट्रिक मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर त्यामध्ये एक शक्तिशाली बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. पूर्ण चार्ज केल्यावर हा बार 500 किमी पर्यंत प्रवास करू शकतो.
किंमत
किमतीचा विचार करता, Tata Curve चे इलेक्ट्रिक व्हर्जन सुमारे 18 लाख रुपयांच्या किमतीत देऊ केले जाऊ शकते, तर ICE इंजिन कारची किंमत 15 लाख रुपये असू शकते.