ऑटोमोबाईल

Upcoming Tata Car : मार्केट गाजवायला येत आहे टाटाची ‘ही’ जबरदस्त कार, फीचर्स आणि किंमत लीक…

Tata Altroz ​​Racer : जर तुम्ही नजीकच्या काळात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा लवकरच आपले आगामी मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

कपंनी टाटा अल्ट्रोज रेसर नावाची कार लवकरच लॉन्च करणार आहे. नुकताच या प्रिमियम हॅचबॅकचा नवीन टीझर प्रदर्शित झाला आहे, त्यामध्ये या कारचे वैशिष्ट्य लीक झाले आहेत. या टीझरमध्ये एका खास फीचर देखील देण्यात आला आहे. तसेच या वाहनाचे बुकिंगही सुरू झाले आहे.

टीझर मध्ये, Tata Altroz ​​Racer मध्ये कारच्या बाह्य लुकची झलक दाखवण्यात आली आहे. हे वाहन ड्युअल टोन स्कीमसह लॉन्च केले जाऊ शकते. या कारमध्ये पांढऱ्या रंगाचे पट्टेही देण्यात येणार असून वापरकर्त्यांना इलेक्ट्रिक सनरूफही देण्यात येणार आहे. Tata Altroz ​​Racer ची वैशिष्ट्ये, किंमत आणि लॉन्च तारखेबद्दल जाणून घेण्यासाठी बातमी शेवट पर्यंत वाचा…

Tata Altroz ​​Racer चे फीचर्स, किंमत आणि लॉन्च डेट बद्दल बोलायचे झाले तर या वाहनाचे फीचर्स अप्रतिम आहेत. या वाहनात 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड इंजिन दिले जाऊ शकते. याशिवाय या वाहनात सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात येणार आहे. या इंजिनमधून कारला 118 BHP पॉवर आणि 170 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळणार आहे. हे वाहन 10.25 इंच इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, ऑटो क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्ससह येईल.

याशिवाय ड्रायव्हिंगसाठी अनेक मोड्स, सिंगल पेन इलेक्ट्रिक सनरूफ आणि ग्रे कलर इंटीरियर देखील दिले जाऊ शकतात. इतकंच नाही तर टाटा मोटर्सच्या या आगामी मॉडेलमध्ये स्टीयरिंगवर ऑडिओ कंट्रोलसोबतच क्रूझ कंट्रोलही दिला जाऊ शकतो. Tata Altroz ​​Racer च्या लॉन्च तारखेबद्दल बोलायचे झाले तर ही कार कंपनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लॉन्च करू शकते.

किंमत

Tata Altroz ​​Racer च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, हे वाहन थेट Hyundai च्या i-20 NLine शी स्पर्धा करेल. या वाहनाची नवीन आवृत्ती, रेसर कंपनी सुमारे 10 ते 13 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च केली जाऊ शकते. तुमच्या माहितीसाठी Altroz ​​चे सध्याचे व्हर्जन कंपनीने 6.64 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केले आहे. तर या वाहनाच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 10.80 लाख रुपयांपर्यंत आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts