Car Price Drop : नवीन वर्षात आपल्यापैकी अनेकांनी नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले असेल. अनेकांनी नवीन वर्षात नवीन कार खरेदी देखील केली असेल. मात्र जर तुम्ही नवीन वर्षात कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल
तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील एका नामांकित कंपनीने आपल्या लोकप्रिय कारवर तब्बल तीस हजार रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे.
त्यामुळे कंपनीची ही लोकप्रिय कार ग्राहकांना स्वस्तात खरेदी करता येणार आहे. परिणामी सर्वसामान्यांचे कार खरेदीचे स्वप्न आता स्वस्तात पूर्ण होणार आहे.
कोणत्या कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट ?
ज्या लोकांना स्वस्तात सीएनजी कार खरेदी करायची असेल अशा लोकांसाठी ह्युंदाई या कंपनीने एक मोठी बंपर ऑफर सुरू केली आहे. कंपनीने लोकप्रिय सीएनजी कार औरा यावर 30000 पर्यंतचा डिस्काउंट जाहीर केला आहे.
खरेतर ह्युंदाई कंपनीची ही Hyundai Aura ही कार बाजारात पाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 6.48 लाखांपासून सुरू होते. दरम्यान या गाडीवर कंपनीकडून तीस हजारापर्यंतची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान आता आपण या गाडीवर तीस हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर नेमकी आहे तरी काय याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे ऑफर
कंपनीच्या माध्यमातून या लोकप्रिय कारवर मॉडेलनुसार डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये 2024 मॉडेलच्या कार वर 15 ते 20 हजारापर्यंतचा डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे. यात दहा हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस चा समावेश होतो.
तसेच कॅश डिस्काउंट हा पाच हजार किंवा दहा हजार रुपयांचा राहणार आहे. पेट्रोल कारसाठी कॅश डिस्काउंट पाच हजार रुपये असेल आणि सीएनजी कारसाठी कॅश डिस्काउंट हा दहा हजार रुपयाचा राहणार आहे.
मात्र कंपनीकडून आधीचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी 2023 च्या मॉडेलवर तब्बल 30000 पर्यंतचा डिस्काउंट ग्राहकांना उपलब्ध होत आहे. त्यामध्ये एक्सचेंज बोनस हा वीस हजार रुपयाचा राहणार आहे आणि कॅश डिस्काउंट हा दहा हजार रुपयाचा राहणार आहे.