ऑटोमोबाईल

Hyundai Alcazar : ह्युंदाई अल्हाझारचे फेसलिफ्ट मॉडेल वर्षाच्या अखेरीस होईल लाँच, ‘इतकी’ असेल किंमत…

Hyundai Alcazar : Hyundai आगामी काळात Alcazar चे Facelift मॉडेल भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे. या SUV कडून Hyundai च्या खूप अपेक्षा आहेत. या SUV वर अजूनही काम चालू आहे, अशास्थितीत याच्या लॉन्च तारखे बद्दल कोणतीही अधीकृत माहिती समोर आलेली नाही, पण ही SUV या वर्षी लॉन्च केली जाऊ शकते असे म्हंटले जात आहे. Hyundai च्या या SUV मध्ये ग्राहकांना कोणता खास अनुभव मिळणार आहे, तसेच त्याची किंमत किती असेल याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग…

Hyundai Alcazar फेसलिफ्ट अपडेटेड फीचर्स

कंपनी नवीन Alcazar फेसलिफ्ट SUV मध्ये अनेक मोठे अपडेट्स देत आहे. ही कार 6 आणि 7-सीटर अशा दोन्ही पर्यायांसह सादर केली जाईल. सुरक्षेच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यामध्ये ADAS सूटची सुविधा असेल. मिळालेल्या माहितीच्या आधारे, नवीन Hyundai Creta चे फीचर्स या SUV मध्ये शेअर केले जाऊ शकतात. अद्ययावत मॉडेलमध्ये नवीन फ्रंट ग्रिल आणि बम्परसह स्प्लिट हेडलॅम्प सेटअप व्यतिरिक्त, नवीनतम कारमध्ये रॅपराउंड स्टाइल टेलगेट आणि कनेक्टेड टेललॅम्प्स सारखी वैशिष्ट्ये मिळतील. त्याच्या आतील भागात नवीनतम तंत्रज्ञानासह सुसज्ज डॅशबोर्ड आणि क्रेटा फेसलिफ्ट मॉडेलसारखे नवीन कनेक्टेड स्क्रीन लेआउट समाविष्ट असू शकते.

Hyundai Alcazar फेसलिफ्टमध्ये समाविष्ट असलेल्या पॉवरट्रेनच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, या SUV मध्ये 160hp क्षमतेचे 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 116hp क्षमतेचे 1.5-लीटर डिझेल इंजिन असेल, जे आधीपासून विकले जात असलेल्या Hyundai Alcazar मॉडेलसारखेच असेल. हे दोन्ही इंजिन ट्रान्समिशनसाठी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने जोडले जाऊ शकतात.

Hyundai Alcazar फेसलिफ्ट किंमत

Alcazar फेसलिफ्ट मॉडेलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, फीचर्समधील बदलासोबतच त्याची किंमतही वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या SUV ची किंमत कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही.

भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या Hyundai Alcazar च्या सध्याच्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 16.77 लाख ते 21.28 लाखांपर्यंत सुरू होते. येथे लाँच केल्यानंतर, Hyundai Alcazar फेसलिफ्ट त्याच्या विभागातील प्रतिस्पर्धी कार टाटा सफारी, महिंद्रा XUV700 आणि MG हेक्टर प्लस यांना कठीण स्पर्धा देऊ शकते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts