Hyundai Vs Kia : बाजारात हुंदाई या कार निर्मात्या कंपनीच्या गाड्यांची लोकप्रियता खूपच अधिक आहे. ह्युंदाई या कंपनीची क्रेटा ही कार ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरली आहे. या गाडीने अनेकांना भुरळ घातली आहे. या गाडीचा सेल प्रचंड वाढलेला आहे. पण आता ह्युंदाई कंपनीच्या या गाडीला तगडे कॉम्पिटिशन मिळणार आहे. कारण की, किया कंपनीने आपल्या पॉप्युलर सेल्टोस या कारचे 2024 डिझेल मॉडेल लॉन्च केले आहे.
खरेतर किया कंपनीची ही लोकप्रिय कार ग्राहकांना विशेष आवडत आहे. अनेकांनी या कारची खरेदी केलेली आहे. कीया सेल्टोसचे डिझेल मॉडेल जुलै 2023 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. ही एस यु व्ही ग्राहकांना विशेष आवडली आहे. यामुळे गदगद झालेल्या कंपनीने आता या कारचे 2024 मधील डिझेल मॉडेल नुकतेच लॉन्च केले आहे. या नव्याने लॉन्च झालेल्या कार मध्ये सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
आतापर्यंत ही गाडी ऑटोमॅटिक आणि इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत येत होती. मात्र आता ही गाडी 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सोबतही येणार आहे. ग्राहकांना ही गाडी पाच वॅरिएंट मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता आपण या गाडीच्या विशेषता आणि या गाडीची किंमत अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गाडीचे फिचर्स काय
या नवीन सेल्टोसमध्ये 32 सुरक्षा फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे कंपनीला विश्वास आहे की ही देखील गाडी ग्राहकांमध्ये लोकप्रिय होणार आहे. यामध्ये ड्युअल-स्क्रीन पॅनोरामिक डिस्प्ले, HD टचस्क्रीन नेव्हिगेशन, ड्युअल-झोन पूर्ण स्वयंचलित एअर कंडिशनर आणि R17 43.66 सेमी क्रिस्टल-कट अलॉय व्हील समाविष्ट आहेत.
याव्यतिरिक्त, हे ड्युअल-पेन पॅनोरामिक सनरूफ आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकसह बाजारात आली आहे. त्यामुळे ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस खरी उतरणार असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. तसेच ही गाडी ह्युंदाई कंपनीच्या लोकप्रिय क्रेटा या गाडीच्या डिझेल व्हेरिएंटशी स्पर्धा करणार आहे.
काय राहणार किंमत
या किया सेल्टोस MT डिझेल ही गाडी पाच व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असून या गाडीची सुरुवातीची किंमत 11 लाख 99 हजार रुपये एवढी आहे. तसेच या गाडीच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 18 लाख 27 हजार 900 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. या किमती एक्स शोरूम किमती आहेत. अर्थातच ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे. ही गाडी HTE, HTK, HTK+,HTX, HTX+ या पाच व्हेरिएंट मध्ये बाजारात उपलब्ध आहे.