सणांचा कालावधी आणि नवीन वाहनांची खरेदी ही गोष्ट भारतामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर असल्याचे आपल्याला दिसून येते. सणांच्या पार्श्वभूमीवर शुभ मुहूर्त असतात व त्यामध्ये अनेक नवनवीन वाहने अशा मुहूर्तांच्या पार्श्वभूमीवर खरेदी केले जातात.
त्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून देखील अनेक आकर्षक अशी वाहने या कालावधीत लॉन्च करण्यात येतात. याच प्रकारे या सणासुदीच्या कालावधीमध्ये तुम्हाला देखील एखादी चांगली वैशिष्ट्ये असलेली कार खरेदी करायची असेल तर हा महिना म्हणजे सप्टेंबर महिन्यात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनेक दमदार फीचर्स असलेल्या कार मार्केटमध्ये दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे यात इलेक्ट्रिक कार देखील असणार आहेत.
सप्टेंबर मध्ये लॉन्च होतील या कार
1- मर्सिडीज बेंज Maybach EQS 680- मर्सिडीज च्या माध्यमातून ही कार मागच्या वर्षी चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेली होती व भारतामध्ये ही 5 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. जर आपण या कारच्या अनुषंगाने पाहिले तर कंपनीच्या भारतीय लाईनअप मधील हे एक नवीन मॉडेल असणार असून जे मर्सिडीज मेबॅक जीएलएसमध्ये समाविष्ट होणार आहे.
2- ह्युंदाई अल्काझार फेसलिफ्ट- ही कार 9 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारामध्ये दाखल होणार असून ह्युंदाईची ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पावर ट्रेनमध्ये येणार आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या माध्यमातून या कारची बुकिंग देखील सुरू करण्यात आलेल्या आहे व तुम्ही पंचवीस हजार रुपयांची टोकन रक्कम भरून देखील या कारची बुकिंग करू शकणार आहेत.
3- एमजी विंडसर ईव्ही- एमजी विंडसर ईव्ही ही एक नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही असून ती भारतात 11 सप्टेंबर रोजी लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. या कारमध्ये एक पावरफुल इलेक्ट्रिक मोटर असणार असून जी 200 एचपी पावर आणि 350 एनएम टॉर्क प्रदान करू शकते. एसयूव्ही लॉंग ड्राइविंग रेंज आणि नवीन तंत्रज्ञानासह बाजारात येण्याची शक्यता असून या कारची किंमत 25 ते 30 लाखांच्या दरम्यान असेल अशी एक शक्यता आहे.
4- टाटा नेक्सन सीएनजी- टाटा नेक्सन सीएनजी देखील सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाण्याची शक्यता असून कंपनीच्या माध्यमातून या कारची चाचणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. 2024 च्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये देखील सादरीकरण करण्यात आलेले होते. मात्र या कारची लॉन्चिंगची तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही.