New Sports Car : सध्या एसयूव्हीचा समावेश आहे. तरुणांमध्ये एसयूव्हीची क्रेझ वाढत आहे. अनेक कंपन्या विविध फिचर्ससह आपल्या कार मार्केटमध्ये आणत असतात. आता ब्रिटीश स्पोर्ट्स कार निर्माता कंपनी Lotus भारतात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.
येत्या 9 नोव्हेंबर रोजी ही कंपनी भारतात पाऊल ठेवेल. एका रिपोर्टनुसार या ब्रँडच्या दोन कार भारतात लाँच केल्या जातील, ज्यात Emira Sportscar आणि Electra एसयूव्ही चा समावेश आहे. लोटस इलेक्ट्रा एसयूव्ही इलेक्ट्रिक वाहन आहे.
या दोन्ही कार सीबीयूच्या माध्यमातून भारतीय बाजारात विकल्या जातील. येत्या काही दिवसांत बुकिंग आणि डिलिव्हरी सुरू होईल. या वाहनांच्या नावांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
लोटस इलेक्ट्रा
या इलेक्ट्रिक कारचे डिझाइन कोणालाही आकर्षित करू शकते. इलेक्ट्रा (611 एचपी), इलेक्ट्रा एस (611 एचपी) आणि इलेक्ट्रा आर (918 एचपी) असे इलेक्ट्राचे तीन प्रकार आहेत. ही एसयूव्ही 109kWh बॅटरीसह येते,
जी 800V सिस्टमवर आधारित आहे आणि 350kW युनिटद्वारे चार्ज केली जाते. यात आरामदायी आणि प्रशस्त केबिन आहे. सिंगल चार्जवर याची रेंज 600 किलोमीटरपर्यंत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 2.5 कोटी ते 3.1 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.
लोटस एमीरा
हा ब्रँड लाइटवेट स्पोर्ट्स कारपैकी एक आहे. आकर्षक डिझाईनसोबतच पॉवर आणि कम्फर्टही देते. या कारमध्ये डोअर पॉकेट, डिजिटल इंस्ट्रुमेंट्स, कपहोल्डर आणि सेंट्रल टचस्क्रीन सह अनेक आलिशान फीचर्स देण्यात आले आहेत.
स्पोर्ट्सकार दोन पॉवर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे: 2.0-लीटर 4-सिलिंडर एएमजी इंजिन जे 365 एचपी पॉवर जनरेट करते. 3.5 लीटर व्ही 6 टोयोटा सोर्स युनिट 406 एचपी पॉवर जनरेट करते. 8-स्पीड गिअरबॉक्स देखील उपलब्ध आहे.
याची एक्स शोरूम किंमत 2.5 ते 3 कोटी रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या दोन्ही कार बाजारात चांगलाच धमाका करतील अशी अपेक्षा आहे. एसयूव्ही प्रेमींमध्ये व काहीतरी युनिक पाहिजे असणाऱ्यांमध्ये या कार लोकप्रिय होतील.