भारतामध्ये सध्या दुचाकी मार्केटमध्ये स्वस्त स्कूटरला मोठी मागणी आहे. यामाहाच्या Fascino 125 आणि हिरोच्या डेस्टिनी 125 Xtec या दोन स्मार्ट स्कूटर्स या स्वस्त सेगमेंटमध्ये येतात. दोन्ही स्कूटरमध्ये 125 सीसी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही नवीन जनरेशनची स्कूटर असून यात सुरक्षेसाठी दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. या बाइकमध्ये ग्राऊंड क्लिअरन्स देखील शानदार आहे. त्यामुळे रस्ता खराब असेल तरीही काही काळजी करण्याचे कारण नाही.
Yamaha Fascino 125:-या स्कूटरचे वजन 99 किलो आहे. या स्कूटरच्या किमती 81,975 रुपयांपासून सुरु होतात. या फ्यूचरिस्टिक स्कूटरमध्ये 14 डॅशिंग कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. यामाहाची ही स्कुटर 6 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये BS6 इंजिन देण्यात आले आहे.
ही स्कूटर 8.04 बीएचपी पॉवर आणि 10.3 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरमध्ये 5.2 लिटरची फ्यूल टँक देण्यात आली आहे. अतिरिक्त सुरक्षिततेसाठी यात दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेकसह कंबाइंन ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे. त्यामुळे जरी अचानक ब्रेक दाबले तरी या सिस्टीममध्ये दोन्ही चाकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
Hero Destini 125 Xtec:- हिरोची ही शानदार स्कूटर 2 व्हेरियंट मध्ये येते. या बाइकमध्ये सात कलर ऑप्शन आहेत. या स्कूटरच्या किमती 81,101 रुपयांपासून सुरु होतात. हिरो स्कूटरमध्ये 125 सीसीचे दमदार इंजिन देण्यात आले आहे. हे सिंगल सिलिंडर इंजिन हाय पॉवर जनरेट करते. स्कूटरमध्ये 9 बीएचपी पॉवर आणि टॉर्क 10.4 एनएम आहे.
यात अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर आहेत. यात 5 लिटरची फ्यूल टँक आणि कंबाइंड ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे. स्कूटरमध्ये सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एलईडी लाइट्स आहेत. यात 10 इंचाचे टायर आहेत. हिरो डेस्टिनी 125 एक्सटेक मध्ये सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. स्कूटरच्या पुढील बाजूस टेलिस्कोपिक हायड्रोलिक शॉक एब्जॉर्बर आणि मागील बाजूस स्प्रिंग-लोडेड हायड्रोलिक सस्पेंशन देण्यात आले आहे. ही एक हाय स्पीड स्कूटर असून यात आरामदायी सिंगल सीट देण्यात आली आहे.