ऑटोमोबाईल

भारतीय कार बाजारपेठेतील 6 ते 10 लाख रुपये बजेटमधील ‘या’ आहेत सहा एअरबॅग असलेल्या कार! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Budget Friendly Car With 6 Airbags:- भारतीय कार बाजारपेठ म्हटले म्हणजे यामध्ये अनेक नामवंत कंपन्यांच्या वेगवेगळे वैशिष्ट्य आणि किमती असलेल्या कार आपल्याला पाहायला मिळतात व त्यामुळे ग्राहकांना देखील त्यांच्या बजेटमध्ये हवे असलेली फीचर्स असलेले अनेक कारचे पर्याय उपलब्ध होतात.

कमीत कमी किमतीत चांगलीत चांगली फीचर्स मिळतील अशा कार घेण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे आपल्याला दिसून येते. यामध्ये सुरक्षितता ही खूप महत्त्वाची असते व या दृष्टिकोनातून देखील अनेक ग्राहक घेत असलेल्या कारमधील सुरक्षा वैशिष्ट्ये पाहून कार घेण्याला प्राधान्य देतात.

त्यातल्या त्यात जर बजेट फ्रेंडली कार असेल तर उत्तमच. कारमधील जर आपण सुरक्षा वैशिष्ट्य पाहिले तर यामध्ये एअरबॅग या फीचर्सला खूप महत्त्व असते व त्या बाबतीत स्वस्तामध्ये कार मिळेल या दृष्टिकोनातून ग्राहकांचा प्रयत्न असतो.

जर तुम्हाला देखील सहा लाखापासून ते 10 लाखापर्यंत बजेटमध्ये सहा एयरबॅग असलेली कार घ्यायची असेल तर या लेखामध्ये आपण अशाच काही स्वस्तातल्या कार मॉडेलची माहिती बघणार आहोत.

या आहेत बजेट फ्रेंडली सहा एयरबॅग असलेल्या कार

1- निसान मॅग्नाइट- या कारला भारतातली सर्वात परवडणारी एसयूव्ही म्हटले जाते व या कारमध्ये तुम्हाला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले तब्बल सहा एयरबॅग मिळतात. या कारला याच वर्षी फेसलिफ्ट मिळाली असून यामध्ये पाचही जागांसाठी तीन पॉईंट सीट बेल्ट तसेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम,

आयसोफिक्स चाइल्ड सीट्स,ट्रॅक्शन कंट्रोल तसेच हिल असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सारखी वैशिष्ट्य देण्यात आलेले आहेत. निसान मॅग्नाइटमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. यातील एक 96 एनएम टॉर्क आणि 71 बीएचपी पावर जनरेट करण्यास सक्षम आहे

तर दुसरे इंजिन हे 99 बीएचपी पावर आणि 160 एनएमच्या आउटपुटसह दोन लिटर टर्बो इंजिन आहे व या दोन्ही इंजिनांना 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

यामधील एनए एएमटी गिअरबॉक्ससह येते तर टर्बोला सीव्हीटी गिअर बॉक्स देण्यात आले आहे. या कारची किंमत सहा लाखापासून सुरू होते.

2- ह्युंदाई एक्सेटर- या कारची किंमत सहा लाख 13 हजार रुपयांपासून सुरू होते व दहा लाख रुपयांच्या आत सर्वात सुसज्ज असलेल्या कारपैकी एक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ह्युंदाई एक्सेटर या कारमध्ये सहा एअरबॅग,

ईबीडी सह एबीएस, 3 पॉईंट सीट बेल्ट, मागील सेंसर तसेच ड्युअल कॅमेरा डॅशकॅम, मागच्या बाजूला पार्किंग कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम देण्यात आले आहेत.

3- मारुती सुझुकी स्विफ्ट- या कारची किंमत सहा लाख 49 हजार रुपयांपासून सुरू होते. स्विफ्ट ही सहा एअरबॅग असलेली मारुती सुझुकीची सर्वात परवडणारी कार आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून यावर्षी नवीन जनरल स्विफ्ट लॉन्च करण्यात आली आहे

व यामध्ये रिव्हर्स कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्स व त्यासोबत इलेक्ट्रॉनिक स्थिरता इत्यादी सुरक्षा विषयक वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. ही कार 80 बीएचपीपावर आणि 111 एनएम टॉर्कसह 1.2- लिटर नॅचरल एस्पीरेटेड इंजिनद्वारे समर्थित आहे. ही पाच स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी मध्ये उपलब्ध आहे.

4- ह्युंदाई ऑरा- भारतीय कार बाजारपेठेमधील ह्युंदाई ऑरा ही बजेट फ्रेंडली अशी सेडान आहे व या कारमध्ये सहा एअरबॅग देण्यात आले आहेत. तसेच ऑरा लाईनअपला हिल स्टार्ट असिस्ट,

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, आयसोफिक्स माउट्स आणि हिल होल्ड असिस्ट मिळते. ह्युंदाई ऑरा 1.2- लिटर पेट्रोल इंजिन द्वारे समर्थित आहे. या कारची किंमत सहा लाख 49 हजार रुपयांपासून सुरू होते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts