Okaya Moto Faast eScooter : वाढत्या पेट्रोलच्या किमतींमुळे अनेक जण ई-स्कूटर घेण्याकडे वळलेले आहेत. तुम्हालाही आता इलेक्ट्रिक वाहन घ्य्याचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. ओकाया ईव्ही एक नवीन ई-स्कूटर बाजारात आणण्यासाठी सज्ज झाला आहे.
दिल्लीमधील या कंपनीने आपल्या अपकमिंग या ई-स्कूटरला ओकाया मोटो फास्ट (Okaya Moto Faast) असे नाव दिले आहे. ओकायाची ही नवीन ई-स्कूटर 17 ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे. ओकाया मोटो फास्ट ही ओला S1 प्रो, एथर 450X, टीव्हीएस iQube यांसारख्या भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्सशी स्पर्धा करेल.
* आगामी ई-स्कूटरची प्री-बुकिंग सुरू
इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी ओकाया ने ओकाया फास्ट, ओकाया फ्रीडम, ओकाया फास्ट एफ 2 बी, ओकाया एफ 2 एफ सारख्या लोकप्रिय ई-स्कूटर भारतीय बाजारात आणलेल्या आहेत. ओकाया मोटोफास्टच्या लाँचिंगपूर्वी बुकिंग सुरू झाली आहे.
येणाऱ्या सणासुदीच्या काळात, खरेदीदार ओकाया ईव्हीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन प्री-बुकिंग करू शकतात. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर आगामी ओकाया मोटोफास्ट ई-स्कूटरची किंमत 1.50 लाख रुपयांच्या आसपास असेल असा अंदाज आहे.
* रेंज, कलर , व्हेरिएंट सह इतर डिटेल
ओकाया मोटोफास्ट मध्ये LFP आधारित बॅटरी असेल. ओकाया ईव्हीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ओकाया मोटोफास्ट ई-स्कूटर फुल चार्जवर 120 ते 135 किलोमीटर धावेल. ती ताशी 70 किलोमीटर वेगाने धावू शकते. यात 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आणि डिस्क असेल. नवीन स्कूटरमध्ये अलॉय व्हील्स असतील.
ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर डिस्क ब्रेक सपोर्ट मिळेल. ओकाया मोटोफास्ट ई-स्कूटर लाल, निळा, हिरवा, काळा आणि पांढरा अशा पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. ओकाया ईव्हीने या नवीन स्कूटरची मोटर आणि आउटपुट उघड केलेले नाही. तसेच या ई-स्कूटरची किंमत अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.