Electric Bike : भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना आता देशात मोठी मागणी आली आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात वधारली असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे केंद्रशासन देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित करीत आहे. वाढते प्रदूषण नियंत्रणात रहावे यासाठी आणि कच्च्या तेलाच्या आयातीवर निर्बंध लागावेत यासाठी आता इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहित केले जात आहे.
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाइक्स मोठ्या प्रमाणात लॉन्च होत आहेत. मात्र असे असले तरी इलेक्ट्रिक बाइक्स अजूनही भारतीय बाजारात बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर प्रमाणे अजूनही इलेक्ट्रिक बाइकचे मार्केट वाढलेले नाहीये. परंतु हळूहळू भारतीय बाजारात इलेक्ट्रिक बाइक येऊ लागल्या आहेत. देशातील काही कंपन्यांनी इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केल्या आहेत. यामध्ये रिव्हॉल्ट या कंपनीचा देखील समावेश होतो.
रिव्हॉल्ट मोटर्सने भारतीय बाजारात काही इलेक्ट्रिक बाईक्स लॉन्च केल्या आहेत. या विभागात कंपनी आपली उपस्थिती वाढवत आहे. दरम्यान, Revolt Motors ने 2024 च्या अगदी सुरुवातीलाच आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक बाइकची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 2023 मध्ये लाँच केलेल्या RV400 BRZ इलेक्ट्रिक बाईकची किंमत कमी करण्याचे जाहीर केले आहे. या बाईकची विक्री वाढावी यासाठी कंपनीने हा निर्णय घेतलेला आहे.
ही बाईक गेल्यावर्षी एक लाख 42 हजार 950 रुपयांना लॉन्च करण्यात आली होती. आता मात्र या बाईकच्या किमतीत पाच हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. ही बाईक एक लाख 37 हजार 950 रुपयांना नव्याने लॉन्च करण्यात आली आहे. पण बाईकची ही किंमत एक्स शोरूम किंमत राहणार असून ही बाईकची इंट्रोडकरी प्राईस राहणार आहे. म्हणजेच भविष्यात या किमती वाढू देखील शकतात.
दरम्यान कंपनीने लॉन्च केलेली ही नवीन गाडी पाच कलर ऑप्शन मध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांना आपल्या आवडीनुसार या ठिकाणी कलर सिलेक्ट करता येणार आहेत. निश्चितच कंपनीने या नव्याने लॉन्च झालेल्या गाडीची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता या गाडीची सेलिंग वाढणार अशी आशा आहे. तथापि, नवीन किमतीसह लॉन्च झालेल्या या गाडीची ही इंट्रोडकरी प्राईस राहणार आहे भविष्यात कंपनीच्या माध्यमातून या किमती पुन्हा एकदा सुधारित केल्या जातील अशी शक्यता आहे.