ऑटोमोबाईल

Best Mileage Bike: कमी किमतीत तगडे मायलेज देतात भारतातील ‘या’ बाईक! कराल खरेदी तर होईल पैशांची बचतच बचत

Best Mileage Bike:- प्रत्येक व्यक्ती जेव्हा एखादे वाहन खरेदी करतो तेव्हा ते कमीत कमी किमतीमध्ये मिळतील दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतो व यासोबतच मिळणारी वैशिष्ट्ये देखील उत्तम मिळतील अशा प्रयत्नात असतो. यामध्ये जेव्हा आपण बाईक घ्यायला जातो तेव्हा बाईक कोणती विकत घ्यावी? या विचारात असताना देखील या पद्धतीचे विचार आपल्या मनामध्ये येतात.

भारतामध्ये बघितले तर अनेक कंपन्यांच्या बाईक सध्या बाजारपेठेत उपलब्ध असून त्यातील नेमक्या कोणत्या बाईकच्या कमी किमतीत चांगले मायलेज व चांगली वैशिष्ट्ये देतील याविषयी बऱ्याचदा गोंधळ उडतो. त्यामुळे आपण या लेखांमध्ये अशा काही भारतातील बाईक बघणार आहोत ज्या परवडणाऱ्या किमतीमध्ये सर्वाधिक मायलेज देतात.

 या आहेत भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईक

1- होंडा लिव्हो ड्रम होंडा या कंपनीची ही बाईक असून तिचे इंजिन 109.51 सीसी क्षमतेचे असून ती ८.७९ पीएस पावर आणि 9.33 एनएम टॉर्क जनरेट करते. जर आपण या बाईकचे मायलेज बघितले तर ते 74 किलोमीटर पर्यंत आहे असा कंपनीचा दावा असून या बाईकची एक्स शोरूम किंमत 78 हजार पाचशे रुपये आहे.

2- बजाज प्लॅटिना 100- बजाज ऑटोच्या ज्या काही सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय बाईक आहेत त्यापैकी ही एक आहे. या बाईकच्या मायलेज बद्दल कंपनी दावा करते की ही एक लिटर पेट्रोलमध्ये 72 किलोमीटर जाऊ शकते. या बाईकमध्ये 102 cc ची इंजिन येते व या बाईकची एक्स शोरूम किंमत 67 हजार 808 रुपये आहे.

3- हिरो स्प्लेंडर प्लस हिरो मोटोकोर्प कंपनीची ही बाईक आज शेतकऱ्यांपासून ते कॉलेज युवकांपर्यंत खूप प्रसिद्ध आहे. या बाईकमध्ये 97.2 सीसी क्षमतेचे इंजिन येते व ही बाईक एक लिटर पेट्रोलवर 73 किलोमीटरचे मायलेज देते. जर आपण हिरो स्प्लेंडर प्लसची एक्स शोरूम किंमत पाहिली तर ती 75 हजार 141 रुपये आहे.

4- टीव्हीएस स्पोर्ट टीव्हीएस मोटरच्या माध्यमातून ही बाईक दोन मॉडेल्समध्ये येते. ह्या बाईक मध्ये १०९.७ सीसी क्षमतेची इंजिन असून ते ८.१९ बीएचपी पावर आणि 8.7nm टॉर्क जनरेट करते. या बाईकचे मायलेज बघितले तर ती एक लिटर पेट्रोलमध्ये 70 किलोमीटर चालते. या बाईकची एक्स शोरूम किंमत पाहिली तर एका मॉडेलची 71 हजार 223 रुपये आहेत तर दुसऱ्याची 58 हजार 881 रुपये आहे.

5- होंडा शाईन 100- होंडा कंपनीची ही बाईक अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय असून यामध्ये 98.98 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले असून ती एका लिटर पेट्रोलमध्ये 65 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. या बाईकची एक्स शोरूम किंमत 64 हजार 900 रुपये आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts