ऑटोमोबाईल

फळबागांच्या आंतरमशागतीसाठी उत्कृष्ट आहे ‘हा’ 25 एचपीचा पावरफुल मिनी ट्रॅक्टर! मिळेल परवडणाऱ्या किमतीत आणि पैशांची होईल बचत

Farmtrac Atom 26 Mini Tractor:- शेतीसाठी ट्रॅक्टर अतिशय उपयुक्त असे यंत्र असून जवळपास शेतीची संपूर्ण कामे आता ट्रॅक्टरच्या माध्यमातून पार पाडली जातात. इतकेच नाहीतर शेतीसाठी जी काही अनेक यंत्रे विकसित करण्यात आलेली आहेत त्यातील बहुतांश यंत्र ही ट्रॅक्टरचलीत असल्याने या दृष्टिकोनातून देखील ट्रॅक्टरचे महत्त्व अधोरेखित होते.

याकरिता मोठ्या प्रमाणावर शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करण्याला प्राधान्य देतात. परंतु प्रत्येक शेतकऱ्याला मोठे ट्रॅक्टर खरेदी करणे आर्थिक दृष्टिकोनातून शक्य होत नाही किंवा फळबागेतील अंतर मशागतीसाठी देखील मोठे ट्रॅक्टर तितकेसे उपयोगी नसते.

त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मिनी ट्रॅक्टर घेण्याकडे कल असल्याचे आपल्याला दिसून येते. भारतीय ट्रॅक्टर बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांचे मिनी ट्रॅक्टर सध्या उपलब्ध आहेत. परंतु त्यातल्या त्यात पावरफुल आणि कमी किमतीत मिळणारे तसेच शेतीच्या प्रत्येक कामात सरस ठरतील अशा मिनी ट्रॅक्टरची निवड ही खूप गरजेची असते.

त्यामुळे आपण या लेखामध्ये फार्मट्रॅक कंपनीच्या अशाच एका मिनी ट्रॅक्टरची माहिती घेणार आहोत जे फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे शक्तिशाली ट्रॅक्टर आहे व या ट्रॅक्टरचे नाव आहे फार्मट्रॅक ॲटॉम 26 हे होय. हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकते.

काय आहेत फार्मट्रॅक अटॉम 26 मिनी ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये?
कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये 1318 सिसी क्षमतेचे तीन सिलेंडर कुलंट कुल्ड इंजिन दिले असून जे 26 हॉर्स पावर आणि 79.4nm चा टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे. फार्मट्रेक कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये ड्राय टाइप एअर फिल्टर दिला असून शेतामध्ये काम करताना उठणाऱ्या धुळीपासून इंजिनची सुरक्षा करण्यासाठी परिपूर्ण असे आहे.

या ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पावर 21.2 एचपी असून या मिनी ट्रॅक्टरचा आरपीएम 2600 इतका आहे. यामध्ये 24 लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे व हायड्रोलिक क्षमता 750 किलो इतकी आहे.

त्यामुळे एकावेळी जास्त पिकांची किंवा शेतीमालाची वाहतूक करणे शक्य होते. फार्मट्रेक कंपनीचे हे मिनी ट्रॅक्टर 990 किलो वजनाचे असून त्याचा व्हीलबेस 1550 मिमी इतका आहे व याची बॉडी आकर्षक व मजबूत अशी बनवलेली आहे.

फार्मट्रेक ॲटॉम 26 ट्रॅक्टरची इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये
या ट्रॅक्टरमध्ये बॅलन्स्ड पावर स्टेरिंग देण्यात आलेली असल्यामुळे ते खडबडीत रस्ते तसेच शेतामध्ये ड्राईव्ह करण्यास सोयीस्कर ठरते. तसेच कंपनीने यामध्ये नऊ फॉरवर्ड+ तीन रिव्हर्स गिअर्स असलेला गिअरबॉक्स दिला असून या ट्रॅक्टरमध्ये सिंगल टाईप क्लच आणि कॉन्स्टंट मेश टाईप ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

या मिनी ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड प्रतीतास 24.3 किलोमीटर आणि रिवर्स स्पीड 11.2 किलोमीटर प्रति तास इतका देण्यात आला आहे. हा ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्हमध्ये येतो. तसेच या ट्रॅक्टरला देण्यात आलेले ब्रेक पाहिले तर ते मल्टी प्लेट ऑइल एमरस्ड डिस्क प्रकारचे देण्यात आले असून जे टायरवर मजबूत पकड ठेवण्यास सक्षम आहेत.

किती आहे या मिनी ट्रॅक्टरची किंमत?
भारतीय बाजारपेठेमध्ये फार्मट्रॅक ॲटम 26 या मिनी ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत पाच लाख 65 हजार रुपये ते 5 लाख 85 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली असून आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स इत्यादीमुळे काही राज्यांमध्ये या किमतीत बदल होऊ शकतो. तसेच कंपनीने या ट्रॅक्टरला पाच वर्षांची वारंटी दिली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts