Top Cheapest CNG Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये CNG कारच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने अनेकजण CNG कार खरेदी करण्याकडे वळत आहेत. तुम्हीही देशातील टॉप CNG कार खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.
मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्सकडून त्यांच्या सर्वाधिक CNG कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी बजेटमध्ये उत्तम CNG कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात मारुती ते टाटाच्या स्वस्त कार उपलब्ध आहेत.
1 Maruti Suzuki Alto K10
मारुती सुझुकीकडून त्यांच्या सर्वात स्वस्त Alto K10 कारमध्ये देखील कंपनी फिटेड CNG किट पर्याय दिला आहे. Alto K10 कारच्या CNG मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.74 लाख रुपये आहे. कारमध्ये 998 cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. Alto K10 CNG कार 33.85 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
2 मारुती सुझुकी वॅगन आर
मारुती सुझुकीची वॅगन आर कार देखील पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्याय देण्यात आला आहे. मारुती सुझुकी वॅगन आर CNG कारची एक्स शोरूम किंमत 6.45 लाख रुपये आहे. कारचे CNG मॉडेल 34.05 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. वॅगन आर CNG कारमध्ये 1197 cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
3 मारुती सुझुकी एर्टिगा
मारुती सुझुकीची एर्टिगा 7 सीटर कार देशातील सर्वाधिक लोकप्रिय कारपैकी एक आहे. एर्टिगा कारमध्ये पेट्रोल आणि CNG पर्याय देण्यात आला आहे. एर्टिगा कारचे सीएनजी मॉडेल 26.11 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये 1462 cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
4 Hyundai Exter
ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची मायक्रो एसयूव्ही Exter मध्ये देखील CNG पर्याय दिला आहे. ह्युंदाई Exter मायक्रो एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारच्या CNG मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.33 लाख रुपये आहे. Exter मिनी एसयूव्ही CNG कार 27.1 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
5 टाटा पंच
टाटा मोटर्सकडून 2021 मध्ये त्यांची पंच मिनी एसयूव्ही लाँच केली आहे. मात्र 2023 च्या शेवटी या कारमध्ये CNG पर्याय देण्यात आला आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.10 लाख रुपये आहे. टाटा मोटर्सची पंच मिनी एसयूव्ही कार CNG व्हेरियंटमध्ये 26.99 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.