Toyota Innova Crysta New Variant : तुमचेही या चालू नवीन वर्षात कार खरेदी करण्याचे स्वप्न आहे का? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. विशेषता ज्यांना टोयोटा इनोवा क्रिस्टा खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी फायद्याची ठरणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जापानची दिग्गज ऑटो कंपनी टोयोटाने भारतीय कार बाजारात इनोवा क्रिस्टाचे नवीन व्हेरियंट लॉन्च केले आहे.
त्यामुळे जर तुम्ही ही नजीकच्या भविष्यात कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला आता बाजारात आणखी एक नवीन आणि चांगला दमदार विकल्प पाहायला मिळणार आहे.
दरम्यान आज आपण जपानची दिग्गज ऑटो कंपनी टोयोटाने लॉन्च केलेल्या इनोवा क्रिस्टाचे नवीन वॅरीयंट नेमके कसे आहे, यामध्ये कोणकोणते दमदार फीचर्स अपलोडेड आहेत, याची किंमत काय आहे ? याविषयी अगदी सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहेत फिचर्स अन कसे आहे इंजिन
मिळालेल्या माहितीनुसार टोयोटा कंपनीने आपल्या सर्वाधिक लोकप्रिय Innova Crysta या SUV चे GX+ हे नवीन वॅरीयंट भारतीय बाजारात लाँच केले आहे. हे नव्याने लाँच झालेले वॅरीयंट आधीच्या वॅरीयंटच्या तुलनेत अधिक दमदार फिचर्सने अपलोडेड आहे.
पण या गाडीच्या पॉवर ट्रेनमध्ये अर्थातच इंजिन मध्ये कोणताच मूलभूत बदल झालेला नाही. टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 2.4-लिटर डिझेल इंजिनसह लाँच करण्यात आली आहे.
जे की जास्तीत जास्त 150hp पॉवर आणि 343Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. एसयूव्हीचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
या गाडीत तुम्हाला अनेक अतिरिक्त फीचर्स पाहायला मिळतील. या SUV मध्ये ग्राहकांना रियर कॅमेरा, ऑटो-फोल्ड मिरर, डॅश कॅम, डायमंड कट अलॉय व्हील आणि प्रीमियम फॅब्रिक सीट यांसारखी अतिरिक्त फिचर्स मिळणार आहेत.
दुसरीकडे, सुरक्षिततेसाठी, Toyota Innova Crysta GX+ वॅरीयंटमध्ये मागील कॅमेरा, SRS एअरबॅग, वाहन स्थिरता नियंत्रण, हिल असिस्ट कंट्रोल, ABS तंत्रज्ञान यांसारखी अद्ययावत फीचर्स उपलब्ध आहेत.
कंपनीने या नवीन व्हेरियंटमध्ये एकूण 14 नवीन फीचर्स देण्यात आलेत, असा मोठा दावा केला आहे. ही नव्याने बाजारात आलेली Innova Crysta GX+ 7 आणि 8 सीटर अशा दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
किंमत किती आहे ?
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या गाडीची किंमत किती आहे? हाती आलेल्या माहितीनुसार, Toyota Innova Crysta GX+ व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 21.39 लाख ते 21.44 लाख रुपये दरम्यान ठेवण्यात आली आहे. ही गाडीची एक्स शोरूम किंमत आहे. ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.