Toyota Innova Flex Fuel : बाजारात आता पेट्रोल आणि डिझेलसोडून एका खास इंधनावर चालणाऱ्या कारचे अनावरण करण्यात आले आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना इंधनासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नवीन इनोव्हा लाँच केली आहे.
टोयोटाच्या प्रसिद्ध MPV इनोव्हा चा नवा अवतार आता ग्राहकांना पाहायला मिळणार आहे. ही नवीन टोयोटा इनोव्हा नेहमीच्या पेट्रोलऐवजी 40% इथेनॉल आणि 60% इलेक्ट्रिक एनर्जीवर धावणार आहे. यात शानदार फीचर्स मिळतील. कसे ते जाणून घ्या सविस्तरपणे.
खरतर या कारचे लाँचिंग हे पर्यायी इंधन आणि वायू प्रदूषण रोखण्याच्या दिशेने टाकलेले खूप महत्त्वाचे पाऊल असून या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी आणि केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांनी देखील हजेरी लावली होती.
जाणून घ्या खासियत
नवीन कार 60 टक्के विद्युतीकृत ऊर्जा आणि 40 टक्के बायो इथेनॉलवर चालेल. त्यामुळे फ्लेक्स इंधनामुळे कारच्या मायलेजमध्ये झालेली घट सहज आपल्याला भरून काढता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगातील ही अशा प्रकारची पहिली कार असेल. ज्यात जुनी स्टार्ट सिस्टम बसवली आहे, ज्यामुळे या कारचे इंजिन उणे 15 डिग्री सेंटीग्रेड तापमानातही सुरळीतपणे काम करेल.
परंतु इथेनॉल जास्त पाणी शोषून घेईल. या कारमध्ये वापरलेले इंजिन भारतीय बाजारात तयार करण्यात आले आहे. त्यात वापरलेले घटक पूर्णपणे पाणी प्रतिरोधक असल्याने गंजण्याचा धोका नाही. सध्या त्याचा प्रोटोटाइप तयार केला असून लवकरच त्याचे उत्पादन मॉडेलही जगासमोर येईल.
काय असते फ्लेक्स-इंधन?
खरंतर फ्लेक्स-इंधन हे विशेष प्रकारचे तंत्रज्ञान असून जे वाहनांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल वापरण्याची परवानगी देत आहे. फ्लेक्स इंधन हे गॅसोलीन (पेट्रोल) आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलच्या मिश्रणापासून बनवण्यात आलेले पर्यायी इंधन आहे. फ्लेक्स-इंधन वाहन इंजिन एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनावर चालण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
इतकेच नाही तर इंजिन आणि इंधन प्रणालीतील काही बदलांशिवाय, ही वाहने नियमित पेट्रोल मॉडेल्ससारखीच आहेत. नवीन तंत्रज्ञान नाही, कार बायबलनुसार हे तंत्रज्ञान पहिल्यांदा 1990 च्या दशकात सादर केले होते. तसेच ते 1994 मध्ये सादर केलेल्या फोर्ड टॉरसमध्ये ते मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आले होते. 2017 पर्यंत, जगातील रस्त्यांवर एकूण 21 दशलक्ष फ्लेक्स-इंधन वाहने होती.
कसे तयार होते इंधन?
दिलासादायक बाब म्हणजे देशासाठी फ्लेक्स इंधनाचे उत्पादन चिंतेचा विषय नाही, कारण ते ऊस, मका यांसारख्या उत्पादनांपासून बनवण्यात येते. भारतात पिकांचे पुरेशा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शिवाय हे समजून घ्या की ऊस आणि मक्यापासून बनवलेले असल्याने त्याला अल्कोहोल बेस इंधन असेही म्हटले जाते.
त्याच्या उत्पादन प्रक्रियेत स्टार्च आणि साखर किण्वन करण्यात येते. याशिवाय इथेनॉल इंधन सामान्य पेट्रोलच्या तुलनेत खूपच किफायतशीर असून ज्या ठिकाणी पेट्रोलची किंमत 100 रुपये आहे, तर इथेनॉलची किंमत फक्त 60 ते 70 रुपये इतकीच आहे.