भारतामध्ये अनेक कंपन्यांच्या सर्वात उत्कृष्ट वैशिष्ट्य असलेल्या एसयूव्ही कार लॉन्च केल्या जात असून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीमध्ये लॉन्च केल्या जात आहेत.
अगदी याच पद्धतीने टोयोटा किर्लोस्कर मोटरने तीन एप्रिल 2024 रोजी भारतीय बाजारामध्ये सर्वात स्वस्त एसयुव्ही लॉन्च केली असून ही टोयोटा कंपनीचे सर्वात स्वस्त एसयुव्ही आहे.
महत्वाचे म्हणजे टोयोटा कंपनीने कालपासूनच या कारची अधिकृतपणे बुकिंग सुरू केले असून डिलिव्हरी देखील लवकरात लवकर सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे टोयोटाने ही कार बारा व्हेरियंट आणि आठ कलरमध्ये सादर केलेली आहे. एवढेच नाही तर या कार सीएनजीसह देखील उपलब्ध असून या कारचे नाव टोयोटा टेझर असून ती टाटा नेक्सन, किया सोनेट, रेनॉल्ट किगर इत्यादी कारशी तगडी टक्कर देणार आहे.
टोयोटाच्या अर्बन क्रुझर टेझरची वैशिष्ट्ये
या कारमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आलेले असून यामध्ये नवीन डिझाईन केलेले हनीकॉम्ब पॅटर्न ग्रील आणि नवीन फ्रंट बंपर समाविष्ट करण्यात आलेले आहे. तसेच एलइडी डीआरएलमध्ये समोरील तीन क्युब्स ऐवजी नवीन रेखीय डिझाईन देण्यात आलेले आहे.
तसेच टेल लाईटमध्ये देखील सुधारणा करण्यात आलेले असून पूर्ण रुंदीच्या लाईट बारशी ते कनेक्ट केलेले आहे. तसेच या कारला 16 इंच डायमंड कट आलोय व्हील्स देण्यात आलेले आहेत.या कारचे कॅबिन आणि डॅशबोर्ड लेआउट पाहिला
तर तो मारुती सुझुकीच्या स्विफ्ट सारखा असून कंपनीच्या अर्बन क्रुझर टेझरला ड्युअल टोन ब्राऊन आणि ब्लॅक अपहोलस्ट्री मिळते. तसेच इंटेरियर फीचरमध्ये एसयूव्ही वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कारप्ले, स्वयंचलित हवामान नियंत्रण,
कनेक्टेड कार टेक, OTA अपडेट्स, डीआरएलसह स्वयंचलित एलईडी हेडलॅम्प, 360 डिग्री कॅमेरा, हेडअप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी,नऊ इंचाचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन देण्यात आलेला आहे.
तसेच टिल्ट आणि टेलिस्कोपिक ऍडजेस्टेबल स्टेरिंग व्हिल, सहा स्पीकर साऊंड सिस्टम, सेमी डिजिटल क्लस्टर, पूश बटन स्टार्ट, रियर एसी व्हेन्ट, क्रुझ कंट्रोल यासारखे अनेक वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत.
टोयोटा अर्बन क्रुझर टेझरचे इंजिन कसे आहे?
या कारमध्ये 1.2 लिटर चार सिलेंडर नॅचरल एस्पीरेटेड पेट्रोल इंजन देण्यात आलेले असून जे ९० एचपी पावर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच हे इंजिन 77.5 एचपी पावर आणि सीएनजीसह 98.5 एनएम टॉर्क जनरेट करते.
ट्रान्समिशनकरिता इंजिनसह पाच स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सीएनजी प्रकारामध्ये मात्र एमटी गिअर बॉक्स उपलब्ध आहे. तसेच या कारचे दुसरे इंजिन 1.0 लिटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन असून ते 100 एचपी पावर आणि 147 एनएम टॉर्क जनरेट करते.
ट्रान्समिशनकरिता यामध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचा पर्याय देण्यात आलेला आहे.
किती आहे टोयोटा अर्बन क्रुझर टेझरची किंमत?
टोयोटा कंपनीची ही सर्वात स्वस्त एसयूव्ही असून तिची किंमत सात लाख 73 हजार( एक्स शोरूम) रुपयांपासून सुरू होते तर टॉप एन्ड प्रकाराकरिता तेरा लाख तीन हजार रुपये( एक्स शोरूम) पर्यंत जाते. तसेच ही कार सीएनजी सह उपलब्ध असून त्याची किंमत आठ लाख 71 हजार रुपये( एक्स शोरूम) इतकी आहे.