TVS Apache RTR 160 : भारतीय बाजारात TVS च्या अनेक बाईक्स लाँच होत असतात. शानदार फीचर्स आणि शक्तिशाली इंजिनमुळे या बाईक्स इतर कंपन्यांना टक्कर देतात. काही दिवसांपूर्वी कंपनीने Apache RTR 160 लाँच केली होती.
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, सिंगल सिलेंडर 159.7 cc इंजिन आणि 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. कंपनीची ही शानदार बाईक तुम्ही 15 हजारांमध्ये खरेदी करू शकता. काय आहे प्लॅन, जाणून घ्या सविस्तर.
जाणून घ्या किंमत
किमतीचा विचार केला तर TVS Apache RTR 160 ची सुरुवातीची किंमत 1,26,120 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी ऑन-रोड रु. 1,47,020 पर्यंत जाते.
जाणून घ्या फायनान्स प्लॅन
समजा तुम्ही ही बाईक रोख पैसे देऊन खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे १.४७ लाख रुपये असणे गरजेचे आहेत. समजा जर तुमच्याकडे इतके बजेट नसेल, तर काळजी करू नका. आता तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही ती फक्त 15,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करू शकता.
तसेच ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, तुमचे बजेट 15,000 रुपये इतके असेल, तर या आधारावर बँक तुम्हाला 1,32,020 रुपयांची कर्ज रक्कम जारी करू शकते. हे लक्षात घ्या की या कर्जाच्या रकमेवर बँक ९.७ टक्के वार्षिक व्याजदर लागू असेल.
कर्जाची रक्कम मंजूर झाल्यास तुम्हाला 15,000 रुपयांचे डाउन पेमेंट जमा करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुढील तीन वर्षांसाठी (कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने निश्चित केलेला कालावधी) प्रत्येक महिन्याला 4,241 रुपये मासिक ईएमआय जमा करावा लागणार आहे.
इंजिन तपशील
यामध्ये कंपनीने सिंगल सिलेंडर 159.7 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 16.04 PS पॉवर आणि 13.85 Nm पीक टॉर्क जनरेट करत असून या इंजिनमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे.
मायलेज
तसेच मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक एक लिटर पेट्रोलवर 47 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देईल. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.
वैशिष्ट्ये
यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, तीन राइडिंग मोड (रेन, स्पोर्ट्स, अर्बन), डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर तसेच डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ओडोमीटर, एलईडी हेडलाइट, एलईडी टेललाइट आणि एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आहे.