Tvs Launch New Scooter : भारतात इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंट मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विविध मॉडेल्स लाँच झाले आहेत. यामुळे भारतात आता इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याला प्राधान्य दाखवत आहेत. मात्र आजही असे अनेकजण आहेत ज्यांना इलेक्ट्रिक ऐवजी पेट्रोल स्कूटर वापरणे आवडते.
दरम्यान, अशाच ग्राहकांसाठी टीव्हीएस लवकरच एक मोठा धमाका करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीव्हीएस कंपनी आपल्या लोकप्रिय ज्युपिटर या स्कूटरचे फेसलिफ्ट वर्जन येत्या काही दिवसात भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
त्यामुळे जर तुम्हालाही नजीकच्या भविष्यात नवीन स्कूटर खरेदी करायची असेल तर टीव्हीएस ज्युपिटरचे फेसलिफ्ट वर्जन तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरणार आहे. विशेष म्हणजे TVS ज्युपिटरचे हे फेसलिफ्ट वर्जन होंडा कंपनीच्या एक्टिवाला टफ फाईट देणार असा दावा होत आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या आगामी TVS ज्युपिटर फेसलिफ्ट स्कूटरचे फीचर्स आणि किंमत याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी असणार ज्युपिटर फेसलिफ्ट ?
मीडिया रिपोर्ट नुसार टीव्हीएस कंपनी आपल्या लोकप्रिय ज्युपिटर 110 या स्कूटरचे फेस लिफ्ट वर्जन भारतीय मार्केटमध्ये लवकरचं लॉन्च करणार आहे. या आगामी अपडेटेड वर्जन मध्ये अनेक मूलभूत बदल पाहायला मिळू शकतात. याचे डिझाईन तसेच इंजिन बदलले जाऊ शकते.
या नवीन जनरेशन स्कूटरमध्ये एलईडी हेडलाईट दिले जाणार आहेत. तसेच मागील बाजूस नवीन एलईडी टेललाइट सुद्धा दिले जातील. म्हणजेच या स्कूटरच्या फ्रंट मध्ये आणि बॅक साईडच्या डिझाईन मध्ये बदल होणार आहे. या स्कूटरला एलसीडी डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन अशा सुविधा राहणार आहेत.
म्हणजेच या नव्याने लॉन्च होणाऱ्या स्कूटरमध्ये काही नवीन फीचर्स ग्राहकांना मिळणार आहेत. या आगामी अपडेटेड स्कूटरमध्ये कॉम्बी ब्रेक, एलसीडी डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न नेव्हिगेशन, मोठी सीट, ड्रम ब्रेक आणि 21/13 इंच टायर दिले जाणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.
किंमत किती राहणार ?
या गाडीच्या डिझाईन मध्ये आणि फीचर्स मध्ये काही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. इंजिन मध्ये मात्र कोणताच मूलभूत बदल होणार नाही. म्हणजे सध्याच्या मॉडेलमध्ये जे इंजिन आहे तेच फेसलिफ्ट वर्जन मध्ये देखील राहणार आहे.
मात्र अपडेटेड मॉडेलच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. सध्याच्या मॉडेलची किंमत 73 हजार रुपयांपासून सुरू होते. पण, नवीन स्कूटरची किंमत 5,000 रुपयांपर्यंत वाढवली जाणार अशी शक्यता काही मिळेल रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे.
नक्कीच ज्या लोकांना आगामी काळात नवीन स्कूटर खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी टीव्हीएस ज्युपिटरचे हे फेसलिफ्ट वर्जन एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. या स्कूटरमुळे पेट्रोल स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी बाजारात आणखी एक नवीन विकल्प उपलब्ध होणार आहे.