ऑटोमोबाईल

Under 1 lakh Electric Scooter : पेट्रोलचे झंझट संपले! खरेदी करा 1 लाखांपेक्षा कमी किमतीतील शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर, पहा फीचर्स आणि किंमत

Under 1 lakh Electric Scooter : सध्या ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढायला सुरुवात झाली आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर देशातील ऑटो बाजारात कमी बजेटमधील इलेक्ट्रिक स्कूटर देखील उपलब्ध आहे.

अनेकांना इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची आहे मात्र बजेट कमी असल्याने अनेकांना ती खरेदी करता येत नाही. पण आता बजेट कमी असणाऱ्यांसाठी देशात १ लाख रुपयांच्या किमतीपेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत.

Snow+

तुम्हीही नवीन आणि बजेटमधील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Snow+ ही इलेक्ट्रिक स्कूटर उत्तम पर्याय आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फायरी रेड, सनशाईन यलो, क्लासिक ग्रे आणि सुपर व्हाइट असे चार आकर्षक रंग पर्याय देण्यात येत आहेत.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 25kmph चा टॉप स्पीड देण्यात आला आहे. तसेच या स्कूटरमध्ये USB चार्जिंग सपोर्ट देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारातील एक्स शोरूम किंमत 64,000 रुपये आहे. तसेच ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी तुम्हाला लायसन्सची गरज नाही.

Yulu Wynn

Yulu Wynn या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच ही स्कूटर चालवण्यासाठी तुम्हाला लायसन्सची गरज नाही. या स्कूटरमध्ये तुम्हाला स्वॅप करण्यायोग्य बॅटरी पॅक देण्यात आला आहे.

Yulu Wynn या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 55,555 रुपये आहे. तसेच स्कूटरमध्ये स्कार्लेट रेड आणि मूनलाईट व्हाईट असे दोन रंग पर्याय देण्यात येत आहेत. या स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास देण्यात आला आहे.

Hero Electric Optima

तुम्हीही हिरो कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी Hero Electric Optima ही स्कूटर सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या इलेक्ट्रिक स्कूटरला 45 किमी प्रतितासचा टॉप स्पीड देण्यात आला आहे.

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सिंगल बॅटरी सीएक्स व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 67,190 रुपये आणि ड्युअल बॅटरी पॅक सीएक्स ईआर व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 85,190 रुपये आहे. सिंगल चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर 140 KM ची ड्रायव्हिंग रेंज देते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts