ऑटोमोबाईल

Hyundai Creta शी स्पर्धा करणाऱ्या ‘या’ SUV वर मिळणार 1.40 लाखांपर्यंतची ऑफर, बघा कोणती?

Maruti Suzuki Grand Vitara : ऑटो मार्केटमध्ये मारुती सुझुकी ग्रँड विटारा या मध्यम आकाराच्या एसयूव्हीला मोठी मागणी आहे, अशातच आता या गाडीवर जून महिन्यात बंपर सूट मिळत आहे. होय, मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या हायब्रीड व्हेरिएंटवर यापूर्वी 74,000 रुपयांचे फायदे मिळत होते, ते आता 1.40 लाख रुपयांपर्यंत वाढले आहेत. अशास्थितीत तुम्हाला या वाहन खरेदीवर तब्बल 1.40 लाख रुपयाचा फायदा मिळणार आहे.

या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट देखील समाविष्ट आहे. याशिवाय, या फायद्यांमध्ये 38,000 रुपयांची 3 वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील समाविष्ट आहे. बाजारात मारुती सुझुकी ग्रँड विटारा ची स्पर्धा Honda Elevate, Hyundai Creta, Skoda Kushaq, Volkswagen Taigun आणि MG Astor यांसारख्या SUV शी आहे. जर तुम्हाला ऑफरबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही जवळच्या डीलरशी संपर्क साधू शकतात. या वाहनात ग्राहकांना कोणते फीचर्स अनुभवयाला मिळतात पाहूया…

पॉवरट्रेन

जर आपण पॉवरट्रेनबद्दल बोललो तर ग्राहकांना मारुती सुझुकी ग्रँड विटारामध्ये 3 इंजिनांचा पर्याय मिळतो. पहिले 1.5-लिटर पेट्रोल माइल्ड हायब्रिड इंजिन आहे जे 103bhp ची कमाल पॉवर जनरेट करू शकते. याशिवाय, SUV मध्ये 1.5-लीटर पेट्रोल मजबूत-हायब्रिड इंजिन आहे जे 116bhp ची कमाल पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. त्याच वेळी, SUV मध्ये 1.5-लीट र पेट्रोल CNG इंजिन देखील आहे जे 87.83bhp ची कमाल पॉवर आणि 121.5Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.एसयूव्हीच्या हायब्रीड वेरिएंटमध्ये 27.97 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देण्याचा कंपनीचा दावा आहे.

किंमत आणि वैशिष्ट्ये

दुसरीकडे, जर आपण वैशिष्ट्यांबद्दल बोललो तर, SUV मध्ये पॅनोरामिक सनरूफ, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ॲम्बियंट लाइटिंग, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, फोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, 360-डिग्री कॅमेरा आणि हेड-अप डिस्प्ले आहे. याशिवाय कारमध्ये 6-एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि डिसेंट कंट्रोल सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही 5-सीटर SUV आहे ज्याची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख ते 20.09 लाख रुपयांपर्यंत आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts