Upcoming 7 Seater Cars : देशातील ऑटो मार्केटमध्ये येत्या काळात अनेक कार कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन कार लॉन्च केल्या जाणार आहेत. आगामी काळात अनेक कार कंपन्यांकडून त्यांच्या 7 सीटर कार लॉन्च केल्या जाणार आहेत.
तुम्हीही तुमच्या फॅमिलीसाठी नवीन 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण येत्या काळात आलिशान 7 सीटर कार लॉन्च केल्या जाणार आहेत. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन दिले जाणार आहे.
आगामी काळात टोयोटा, ह्युंदाई आणि MG कार कंपनीकडून त्यांच्या नवीन 7 सीटर कार लॉन्च केल्या जाणार आहेत. टोयोटाकडून त्यांची फॉर्च्युनर सौम्य हायब्रिड इंजिनसह सादर केली जाणार आहे.
टोयोटा फॉर्च्युनर सौम्य हायब्रिड
टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची लोकप्रिय फॉर्च्युनर एसयूव्ही कार नवीन फीचर्स आणि डिझाईनसह लॉन्च केली जाणार आहे. फॉर्च्युनर एसयूव्ही कार 48-व्होल्ट सौम्य संकरित प्रणालीसह जोडलेले GD सिरीजसह लॉन्च केली जाणार आहे. 2024 मध्ये टोयोटा फॉर्च्युनरचे नवीन मॉडेल लॉन्च केली जाणार आहे.
ह्युंदाई Alcazar Facelift
ह्युंदाई मोटर्सकडून Alcazar 7 सीटर एसयूव्ही कार लॉन्च करण्यात आली आहे. आता ह्युंदाईकडून Alcazar चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्यात येणार आहे. कारमध्ये 1.5L टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात येणार आहे. जे 116 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम असेल.
एमजी ग्लोस्टर फेसलिफ्ट
MG कार कंपनीकडून ग्लोस्टर फेसलिफ्ट एसयूव्ही कार लॉन्च करण्यात येणार आहे. या कारची चाचणी करताना दिसून आली आहे. कार 2.0 लिटर टर्बो डिझेल इंजिनसह सादर केली जाईल. कारच्या डिझाईनमध्ये मोठे बदल केले जाऊ शकतात. आगामी येत्या काही महिन्यात ग्लोस्टर फेसलिफ्ट लॉन्च केली जाणार आहे.