Upcoming Cars In India : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी आहे. ती म्हणजे ह्युंदाई कंपनी लवकरच भारतीय कार मार्केटमध्ये तीन नवीन कार लॉन्च करणार आहे. यात दोन इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश आहे हे विशेष. खरे तर भारतात ह्युंदाई कंपनीच्या गाड्यांची नेहमीच क्रेज पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या ह्युंदाई क्रेटा, ह्युंदाई वेन्यू अन ह्युंदाई i20 यांसारख्या गाड्यांची भारतीय कार मार्केटमध्ये मोठा बोलबाला आहे.
दरम्यान, आता कंपनी येत्या काही महिन्यांनी भारतीय कार मार्केटमध्ये काही नवीन आणि काही आपल्या आधीच्या लोकप्रिय मॉडेलचे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण नजीकच्या भविष्यात लॉन्च होणाऱ्या ह्युंदाई कंपनीच्या तीन नवीन कारची माहिती जाणून घेणार आहोत.Hyundai Creta EV : सध्या भारतात इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा बोलबाला आहे. टाटा कंपनीच्या सर्वाधिक इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे इलेक्ट्रिक कार विक्रीच्या बाबतीत टाटा कंपनीचा भारतात पहिला क्रमांक लागतो.
आता मात्र टाटाच्या या मक्तेदारीला आव्हान मिळणार आहे. कारण की, ह्युंदाई कंपनी आगामी काळात तिच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या Hyundai Creta चा इलेक्ट्रिक प्रकार लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे.
खरेतर, Hyundai Creta EV ही भारतीय रस्त्यांवर चाचणी दरम्यान अनेकदा स्पॉट करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Hyundai Creta EV ही एकदा चार्ज केल्यास 450 किलोमीटरपर्यंत धावणार आहे.
Hyundai Inster EV : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी लक्षात घेऊन आता अनेक कंपन्यांनी भारतीय कार मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक कार्स लॉन्च केले आहेत. ह्युंदाई कंपनी देखील आता इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये नवीन कार नावाची करणार आहे.
कंपनीने नुकतेच Hyundai Inster EV चे अनावरण केले आहे. दरम्यान, Hyundai Inster EV ही 2026 पर्यंत भारतीय बाजारात लॉन्च केली जाणार असा दावा केला जात आहे. Hyundai ची ही आगामी इलेक्ट्रिक कार एकदा चार्ज केल्यावर सुमारे 355 किलोमीटर पर्यंत धावणार असे म्हटले जात आहे.
ह्युंदाई Alcazar फेसलिफ्ट : ह्युंदाई ही लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी लवकरच आपल्या एक लोकप्रिय मॉडेल चे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी ह्युंदाईने Creta या आपल्या लोकप्रिय कारचे फेसलिफ्ट वर्जन लाँच केले होते.
विशेष म्हणजे या फेसलिफ्ट कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला आहे. यामुळे आता कंपनी आगामी काळात SUV Alcazar ची अपडेटेड आवृत्ती म्हणजे फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी 2024 च्या फेस्टिव्ह सीझनमध्ये Hyundai Alcazar फेसलिफ्ट लाँच करणार आहे. या अपडेटेड Hyundai Alcazar मध्ये लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञान मिळू शकते. पण, कारच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताचं बदल होणार नाही.