ऑटोमोबाईल

Upcoming Citroen C3 Aircross : जबरदस्त मायलेजसह ऑगस्टमध्ये लॉन्च होणार ही शक्तीशाली SUV कार, पहा प्रीमियम फीचर्स

Upcoming Citroen C3 Aircross : फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroën आता त्यांची आणखी एक शक्तिशाली SUV कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Citroën कंपनीची भारतातील ही चौथी SUV कार असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना या कंपनीची आणखी एक एसयूव्ही कार खरेदीचा पर्याय मिळणार आहे.

Citroën कार निर्माता कंपनीकडून त्यांची C3 Aircross ही शक्तिशाली SUV प्रीमियम फीचर्ससह लॉन्च केली जणार आहे. या कारमध्ये कंपनीकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनके फीचर्स दिले आहे.

कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 10-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम

C3 Aircross SUV कारमध्ये कंपनीकडून 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. डॅशिंग कॉम्पॅक्ट एसयूव्हीला वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 10-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि सात-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देखील देण्यात येणार आहे.

कार हिलमध्ये होल्ड असिस्ट ऑस्टर एअर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंपनीकडून C3 Aircross SUV कारमध्ये 6 एअरबॅग्ज, स्थिरता नियंत्रण प्रणाली, पार्किंग सेन्सर्ससह रियर व्ह्यू कॅमेरा अशी दमदार वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. तसेच हिल होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि EBD (इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन) सह ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) असे फीचर्स देखील देण्यात येणार आहेत.

इंजिन

C3 Aircross SUV कारमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. हे इंजिन 10 bhp पॉवर आणि 190 Nm टॉर्क जनरेट करेल. कंपनीची ५ सीटर कार असणार आहे. तसेच ७ सीटर पर्यायांमध्ये देखील ही कार उपलब्ध असणार आहे.

Citroen C3 Aircross मध्ये 444-लिटरची मोठी बूट स्पेस

Citroen C3 Aircross या एसयूव्ही कारमध्ये 444-लिटरची मोठी बूट स्पेस देण्यात येणार आहे. तसेच ७ सीटर कारला 511-लीटरची मोठी बूट स्पेस देण्यात येईल. कारमध्ये 200 मिमी ग्राउंड क्लीयरन्स देण्यात येईल.

तसेच ही कार Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Suzuki Grand Vitara आणि Toyota Hyrider सारख्या कारला टक्कर देईल असा दावा करण्यात येत आहे. ही कार ऑगस्ट 2023 मध्ये लॉन्च होणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts