Upcoming Tata Cars 2023 : भारतीय ऑटो बाजारात टाटा मोटर्सच्या कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. तसेच टाटा मोटर्सच्या काही एसयूव्ही कार सर्वाधिक विक्रीच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. आता टाटा मोटर्सकडून त्यांच्या आणखी काही कार लॉन्च केल्या जाणार आहेत.
टाटा मोटर्सकडून आगामी काळात त्यांच्या आणखी प्रीमियम फीचरसह काही कार लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना लक्झरी फीचर्स असलेल्या कार खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया टाटा मोटर्स कोणत्या कार लॉन्च करणार.
टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट आणि नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट
टाटा मोटर्सची Nexon एसयूव्ही कार सध्या भारतात सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही कार ठरली आहे. तसेच ही कार इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये देखील अधिक लोकप्रिय झाली आहे. टाटा मोटर्सकडून आता या दोन्ही कार नेक्सॉन फेसलिफ्ट आणि नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट पुन्हा एकदा लॉन्च केल्या जाणार आहेत.
या दोन्ही कारमध्ये कंपनीकडून प्रीमियम फीचर्स जोडले जाणार आहेत. नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये कंपनीकडून 1.2 लीटर टर्बो इंजिन देण्यात येईल. तसेच कारच्या अनेक फीचर्समध्ये बदल केला जाऊ शकतो.
टाटा पंच iCNG आणि पंच EV
टाटा मोटर्सची मिड सेगमेंट SUV म्हणून पंच कारला ओळखले जाते. कंपनीकडून टाटा पंच iCNG प्रकारांमध्ये सादर केली जाऊ शकते. तसेच पंच कार येत्या काही दिवसांत EV सेगमेंटमध्ये देखील येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
टाटा हॅरियर फेसलिफ्ट आणि हॅरियर ईव्ही
टाटा मोटर्सच्या हरिहर कारला सध्या ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनीकडून हॅरियर फेसलिफ्ट आणि हॅरियर ईव्ही लाव्कसार्ह लाँच केले जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. या कारमध्ये ADAS वैशिष्ट्ये देखील दिले जाणार आहे.
टाटा सफारी फेसलिफ्ट
टाटा कंपनीची दमदार फीचर्स असलेली कार सफारी देखील नवीन रूपात लाँच होणार आहे. टाटा मोटर्सकडून सफारी फेसलिफ्ट लाँच केली जाणार आहे. कंपनी 2.0L डिझेल इंजिन आणि मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देणार आहे. तसेच 1.5L टर्बो-पेट्रोल इंजिन देण्याची शक्यता आहे.
टाटा अल्ट्रोझ रेसर
टाटा मोटर्सची अल्ट्रोझ रेसर कार देखील नवीन रूपात भारतीय ऑटो क्षेत्रात दाखल होणार आहे. 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये ही कार सादर करण्यात आली होती. या कारमध्ये अनेक फीचर्स दिले जाणार आहेत. तसेच कारमध्ये 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे.