जेव्हा आपण नवीन कार किंवा बाईक्स किंवा एखादे दुसरे वाहन खरेदी करतो व त्याकरिता आपल्याला काही कालावधीनंतर आरटीओकडून नंबर मिळतो. परंतु यामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना व्हीआयपी नंबर हवा असतो व अशा फॅन्सी किंवा स्पेशल नंबरसाठी व्यक्ती कितीही पैसे मोजायला तयार असतात.
साधारणपणे जर आपण पाहिले तर ही एक प्रक्रिया असून हे संपूर्ण प्रक्रिया तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला व्हीआयपी नंबर मिळू शकतो. तसेच काही व्यक्तींचा लकी नंबर असतो व तो नंबर मिळवण्यासाठी ते जिवाचा आटापिटा करतात व हजारो रुपये खर्च करतात. त्यामुळे आपण या ठिकाणी व्हीआयपी नंबर कसा लागू केला जाऊ शकतो किंवा कसा मिळवता येतो याबद्दलची माहिती बघू.
अशाप्रकारे व्हीआयपी नंबरसाठी करता येतो ऑनलाईन अर्ज?
1- तुम्हाला देखील तुमची कार किंवा बाईक करिता व्हीआयपी नंबर घ्यायचा असेल तर तुम्हाला https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर क्लिक करावे लागेल.
2- या ठिकाणी लॉगिन या विभागामध्ये जाऊन सार्वजनिक वापरकर्ता या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3- नंतर त्या ठिकाणी जे तपशील विचारलेले असतील ते सर्व काळजीपूर्वक तुम्हाला भरावे लागतील.
4- यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल आयडी तसेच मोबाईल नंबर आणि व्हेरिफिकेशन कोड टाकावा लागेल.
5- त्यानंतर तुम्ही साइन अप या पर्यायावर क्लिक करावे.
6- त्यानंतर तुमचा आवडता क्रमांक निवडावा आणि पेमेंट पर्यायावर क्लिक करावे.
7- त्यानंतर तुम्हाला त्या नंबरकरिता बोली लावणे गरजेचे राहील व त्याचा निकाल तुम्हाला नंतर कळतो.
8- तुम्ही बोली जिंकली तर तुम्हाला त्या क्रमांकासाठी पैसे द्यावे लागतील.
9- मी पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक वाटप पत्र मिळते.
ई– लिलावाचा
निकाल कसा बघाल?1- याकरिता देखील तुम्हाला https://fancy.parivahan.gov.in/ या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
2- या ठिकाणी तुम्हाला ऑक्शन रिझल्ट लिंकचा पर्याय निवडावा लागेल.
3- या पर्यायावर तुम्ही क्लिक केल्याबरोबर तुम्ही पुढच्या पानावर रिडायरेक्ट केले जाईल म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही पोहोचाल.
4- नंतर त्या ठिकाणी विचारलेला आवश्यक तपशील भरावा लागेल.
5- यामध्ये तुम्हाला स्टेट तसेच आरटीओ आणि रिझल्ट डेट इत्यादी तपशील भरावा लागेल
6- या पद्धतीने तुम्ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला लिलावाचा निकाल स्क्रीनवर दिसतो.
7-तुम्ही नंबरसाठी असलेला लिलाव जिंकला तर तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर मिळते व ते तुम्ही डाऊनलोड करू शकता.
अंदाजे व्हीआयपी नंबरसाठी किती खर्च येतो?
तसे पाहायला गेले तर व्हीआयपी नंबर साठी आपल्याला किती खर्च करावा लागतो याविषयी एक अंदाज बांधणे शक्य नाही. तरी देखील आपण अंदाज बांधायचा प्रयत्न केला तर 1111,2222,4444,3333,0222,0333,0666 यासारख्या इतर कोणताही नंबर घेण्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये पर्यंत अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. या व्यतिरिक्त काही व्यक्ती लाखो रुपये देखील खर्च करतात.