Electric Car Update :- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून जगातच नाही तर भारतात देखील आता इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढताना दिसत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक कार तसेच इलेक्ट्रिक स्कूटर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सध्या करताना ग्राहक दिसून येत आहेत. तसेच आता दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कारची क्रेझ देखील वाढताना दिसत आहे.
या अनुषंगाने आपण बऱ्याचदा पाहतो की ग्राहकांना इलेक्ट्रिक कार घ्यायची असते. परंतु कमीत कमी किमतीत कोणती इलेक्ट्रिक कार मिळेल याचा शोध असे ग्राहक घेत असतात. त्यामुळे अशा ग्राहकांना मदत होईल या दृष्टिकोनातून आपण काही बजेट फ्रेंडली म्हणजे स्वस्तात मिळणाऱ्या काही इलेक्ट्रिक कारबद्दल माहिती घेणार आहोत.
या आहेत स्वस्तातल्या इलेक्ट्रिक कारElectric Car Update
1-Citron eC3- ही इलेक्ट्रिक कार देखील खूप महत्त्वाची असून या नवीन कारमध्ये 10.2 इंच टचस्क्रीन सिस्टम देण्यात आलेली असून ही कार एका चार्जमध्ये 320 km पर्यंतची रेंज देते. महत्वाचे म्हणजे या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध करून देण्यात आलेले असून ही कार 29.2 kWh बॅटरीसह सादर करण्यात आलेली आहे. ही कार 11 लाख 61 हजार रुपयांना विकली जात असून या कारचे टॉप मॉडेल बारा लाख 99 हजार रुपयांना मिळते.
2- टाटा टियागो ईव्ही- टाटाची ही कार खूप लोकप्रिय असून कंपनीची ही हॅचबॅक कार असून ती XE, XT, XZ+, XZ+ Tech Lux या चार प्रकारांमध्ये सध्या उपलब्ध आहे. या कारमध्ये 19.2 kWh आणि 24 kWh बॅटरी पॅक देण्यात आलेला असून ही कार 315 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. जर आपण या कारच्या बेस मॉडेलची किंमत पाहिली तर ती आठ लाख 69 हजार रुपये आहे. या कारमध्ये चांगले फिचर देण्यात आलेले असून यामध्ये प्रामुख्याने रियर व्ह्यू कॅमेरा, ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आलेली असून टाटाची कार 5 सीटर आहे.
3-Tata Tigor EV-
ही पाच सीटर कार असून ही 315 किलोमीटर ड्रायव्हिंग रेंज देते व या कारमध्ये 26 kWh बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. या कारची किंमत पाहिली तर या कारचा बेस मॉडेलची किंमत 12 लाख 49 हजार रुपये इतकी आहे.4- टाटा नेक्सन ईव्ही- टाटाची ही एक महत्वपूर्ण इलेक्ट्रिक कार असून ती तब्बल सहा प्रकारांमध्ये येते व हे सहा प्रकार म्हणजे क्रिएटिव्ह +, फियरलेस, फियरलेस+, फियरलेस+ एस, एम्पावर्ड आणि एम्पावर्ड+ या सहा प्रकारामध्ये मिळते. या इलेक्ट्रिक एसयू मध्ये 16 इंची आलोय व्हील देण्यात आले असून या कारमध्ये 30kWh बॅटरी देण्यात आलेली असून ही कार 127bhp पावर आणि 465 किमी ड्रायव्हिंग रेंज देते. या कारची एक्स शोरूम किंमत पाहिली तर ती 14 लाख 74 हजार रुपये आहे.
5- एमजी कॉमेट ईव्ही- या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही सिंगल चार्ज केल्यानंतर 230 किलोमीटर पर्यंत रेंज देते. या कारमध्ये 41bhp पावर देण्यात आली असून या कारमध्ये 17.3kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला असूनही बॅटरी 111Nm टॉर्क जनरेट करते. या कारच्या बेस मॉडेलची किंमत सात लाख 98 हजार रुपये इतकी आहे.
त्यामुळे कमीत कमी किमतींमध्ये इलेक्ट्रिक कार शोधणाऱ्या ग्राहकांसाठी या पाच कार खूप महत्त्वाच्या ठरू शकतात.