Yezdi Roadster : लोकप्रिय मोटरसायकल ब्रँड Yezdi भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कंपनीने यावर्षी भारतात एकाच वेळी येझदी अॅडव्हेंचर, येझदी स्क्रॅम्बलर आणि येझदी रोडस्टर या तीन बाइक लॉन्च केल्या.
आता कंपनीने येझदी रोडस्टर मोटरसायकलसाठी दोन नवीन रंगाचे पर्याय सादर केले आहेत. लाल आणि ग्लेशियल व्हाइट असे दोन रंग पर्याय आहेत. कंपनीची ही बाईक आधीपासून स्मोकी ग्रे, स्टील ब्लू, हंटर ग्रीन, गॅलंट ग्रे आणि सिन सिल्व्हर या रंगांमध्ये उपलब्ध आहे. सणासुदीच्या आधी दोन नवीन रंग सादर केल्यामुळे बाईकच्या विक्रीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
बाईकची किंमत काय आहे?
किमतीच्या बाबतीत, नवीन रंगाच्या पर्यायासह येझदी रोडस्टर मोटरसायकलची किंमत रु. 2.01 लाख (एक्स-शोरूम, भारत) पासून सुरू होते. येझदी रोडस्टर मोटरसायकलची थेट स्पर्धा रॉयल एनफील्ड मेटिअर 350 शी आहे. दोन्ही क्रूझर बाइक्स आहेत आणि सारख्याच डिझाइनसह येतात. Meteor 350 च्या तुलनेत येझदी रोडस्टर जरा जड दिसत असला तरी.
इंजिन आणि वैशिष्ट्ये
इंजिनच्या बाबतीत, येझदी रोडस्टर मोटरसायकल लिक्विड-कूल्ड, DOHC इंजिनसह येते. यात 334cc चे इंजिन आहे. हे 8,000 rpm वर 29.78bhp आणि 6,500 rpm वर 29.9Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेललॅम्प्स, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, टॅकोमीटर, घड्याळ, यूएसबी-ए आणि सी प्रकारचे चार्जिंग पॉइंट्स मिळतात. ब्रेकिंगसाठी, समोर 320 मिमीचा मोठा डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 240 मिमी डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.