जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीने फ्रॉड केले जातात. यामध्ये अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा किंवा ट्रिक्सचा वापर केला जातो व आपल्याला कळत देखील नाही. जर आपण पेट्रोल पंपांचा विचार केला तर पेट्रोल पंपांवरील इंधन चोरी ही एक फार मोठी समस्या असून आपल्यासमोर आपली लूट केली जाते तरी आपल्याला कळत नाही.
तसेच पेट्रोल व डिझेल मधील भेसळ तर विचारायलाच नको इतक्या प्रमाणात वाढलेली सध्या दिसून येते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की जेव्हा आपण पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरायला जातो तेव्हा आपल्याला शून्य रीडिंग दाखवली जाते.
परंतु असे असताना देखील इंधन चोरी होऊ शकते व आपल्या डोळ्यासमोर फसवणूक होते तरी आपल्याला कळत नाही. याच दृष्टिकोनातून आता केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून जागो ग्राहक जागो अभियान मोहीम सुरू असून त्या अंतर्गत विभागाच्या एक्स खात्यावर एक पोस्ट करण्यात आलेली आहे व त्यावर संबंधीची माहिती देण्यात आलेली आहे.
पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरताना ही काळजी घ्या
पेट्रोल पंपावर आपल्याला बऱ्याचदा पेट्रोल किंवा डिझेल भरण्या अगोदर शून्य दाखवला जातो. परंतु हे पुरेसे नाही. या ठिकाणी होणारी लूट थांबवण्यासाठी आपल्याला इतर काही गोष्टींवर देखील लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये ग्राहक विभागाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, पेट्रोल किंवा डिझेल भरण्याअगोदर मीटरची रीडिंग शून्य असणे गरजेचे आहे
व महत्त्वाचे म्हणजे डिस्पेन्सिंग मशीनची पडताळणी प्रमाणपत्र डिस्प्ले करणे देखील आवश्यक आहे. जर ग्राहकाला वाटले तर ते पेट्रोल पंपावर जे काही पाच लिटरचे माप उपलब्ध असते त्याचा वापर करून पेट्रोलची किंवा डिझेलची कॉन्टिटी चेक करू शकतात. परंतु पेट्रोल भरताना झिरो देखील नक्की तपासून घ्यावा.
डेन्सिटीची व्यवस्थित काळजी घ्यावी
पेट्रोल आणि डिझेल अशी डेन्सिटी खूप महत्वाची असून डेन्सिटीचा थेट संबंध हा पेट्रोल किंवा डिझेलच्या शुद्धतेशी आहे. पेट्रोल किंवा डिझेलची डेन्सिटी जे काही निर्धारित मानांकन आहेत त्यानुसार असेल खरच तुमची बाईक किंवा वाहन चांगले मायलेज देईल व इंजिन देखील सुस्थितीत राहील.
जर आपण डेन्सिटीचे मानांकन पाहिले तर पेट्रोलचे शुद्धता 730 ते 800 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे. डिझेलची डेन्सिटी पाहिली तर ती 830 ते 900 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे. पेट्रोल पंपाच्या मशीनवर पेट्रोल आणि डिझेलची प्राईस आणि प्रमाण ज्या ठिकाणी लिहिलेले असते त्याच्या खाली डेन्सिटी देखील लिहिले असते. जर पेट्रोल किंवा डिझेलची डेन्सिटी मानांकानुसार नसेल तर ग्राहक पेट्रोल पंपाचे अटेंडंट किंवा मॅनेजर कडे चौकशी करू शकतात व तसा त्यांना अधिकार आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या प्रमाणाबाबत सावधगिरी बाळगा
पेट्रोल आणि डिझेलच्या प्रमाणाबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अनेकदा पेट्रोल पंपाचे कर्मचारी संबंधित मशीन मध्ये इलेक्ट्रॉनिक चीफ इन्स्टॉल करतात व यामुळे मीटर मध्ये इंधनाची संपूर्ण मात्र आपल्याला दिसत नाही.
त्यामुळे जर शंका आली तर ग्राहकाला प्रमाण तपासण्याचा अधिकार आहे व अशावेळी ग्राहक संबंधित कर्मचाऱ्याला पाच लिटरच्या मापाने इंधन मोजण्यास सांगू शकतो हे पाच लिटर चे माप प्रत्येक पेट्रोल पंपावर उपलब्ध असते. तसेच ज्या पंपावर पेट्रोल भरताना फ्लो जर कमी जास्त होत असेल तर त्या ठिकाणी इंधन भरणे टाळणे गरजेचे आहे.
भेसळ अशा पद्धतीने तपासा
ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार पाहिले तर ग्राहक इंधन भेसळीचा तपास करू शकतात व तसा त्यांना अधिकार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर फिल्टर पेपर असतो व या पेपरवर पेट्रोलचे काही थेंब टाकले व पेपरवर डाग राहिला तर पेट्रोलमध्ये भेसळ आहे असे समजावे. फिल्टर पेपरवर डाग राहिला नाही तर पेट्रोल शुद्ध आहे असे समजावे.