अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याची आवक झाली. कांद्याच्या 3125 गोण्यांची आवक झाली.
प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्ती जास्त 2800 तर लाल कांद्यालाही 2800 रुपये इतका भाव मिळाला. तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6655 रुपये इतका भाव मिळाला.
राहाता बाजार समितीत 3 हजार 125 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2400 ते 2800 रुपये तर लाल कांद्याला 2300 ते 2800 असा भाव मिळाला.
कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1650 ते 2350 रुपये, लाल कांद्याला 1650 ते 2250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 800 ते 1600 रुपये तर लाल कांद्याला 800 ते 1600 भाव मिळाला.
गोल्टी उन्हाळी कांद्याला 1800 ते 2000 रुपये व लाल कांद्याला 1900 ते 2100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 700 रुपये व लाल कांद्याला 100 ते 700 रुपये भाव मिळाला.
सोयाबिनची 23 क्विंटल आवक झाली. सोयाबिनला कमीत कमी 6300 ते जास्तीत जास्त 6655 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 6475 असा भाव क्विंटलला मिळाला.
मकाला 1525 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. डाळिंबाच्या 228 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 91 ते 110 रुपये असा भाव मिळाला.
डाळिंब नंबर 2 ला 61 ते 90 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला.