Ahmednagar Onion Rate : बांगलादेशात राजकीय अस्थिरता उद्भवली अन भारतातील शेतकरी चिंतेत आलेत. याचे कारण म्हणजे दरवर्षी भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मक्याची बांगलादेशला निर्यात केली जात असते. आता त्या ठिकाणी राजकीय अस्थिरता उद्भवली असल्याने अन संपूर्ण देशात हिंसाचार माजला असल्याने भारतातून बांगलादेशाला होणारी शेतीमालाची निर्यात मंदावणार असे बोलले जात होते.
यामुळे कांदा आणि मक्याच्या बाजारभावावर याचा विपरीत परिणाम होणार अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र सध्या तरी बांगलादेशात सुरू असणाऱ्या या गदारोळाचा देशांतर्गत कांद्याच्या बाजारभावावर कोणताच विपरीत परिणाम झालेला नसल्याचे दिसत आहे.
उलट पक्षी महाराष्ट्रात कांद्याच्या बाजारभावात दररोज थोडी थोडी का होईना पण सुधारणा पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. काल झालेल्या लिलावात अहमदनगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारामध्ये कांदा बाजार भावात सुधारणा झाल्याची नोंद करण्यात आली.
मार्केट कमिटी कडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात या मार्केटमध्ये कांद्याला 3100 ते 3200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता. मात्र कालच्या लिलावात या ठिकाणी कांद्याला 3600 ते 3700 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे. म्हणजेच बाजार भाव आता जवळपास 500 रुपयांची मोठी वाढ झाली आहे.
एकीकडे बांगलादेशात सुरू असणाऱ्या या हिंसाचारामुळे कांद्याची निर्यात मंदावणार आणि बाजारभावात घसरण होणार अशा चर्चा सुरू असतानाच कांदा बाजार भावात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
नेप्ती उपबाजारात 10 तारखेला झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला ३ हजार १०० ते ३ हजार ५००, दोन नंबरला २६०० ते २१००, तीन नंबरला १९०० ते २६०० व चार नंबरला एक हजार ते १९०० रुपयांचा भाव मिळाला आहे.
जिल्ह्यातील इतर बाजारांमध्ये कांद्याला काय दर मिळाला
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : पारनेर एपीएमसी मध्ये नऊ तारखेच्या लिलावात एक नंबर कांद्याला २९५० ते ३३००, दोन नंबरला २५०० ते २९००, तीन नंबरला २००० ते २४५०, गोल्टीला २५०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
टाकळीभान कृषी उत्पन्न बाजार समिती : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान एपीएमसी मध्ये नऊ तारखेच्या लिलावात सर्वाधिक तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. मात्र मात्र टाकळीभानच्या आवारात कांद्याची आवक कमी होती.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : श्रीरामपूरच्या बाजारात 9 तारखेच्या लिलावात एक नंबर कांद्याला ३००० ते ३४००, दोन नंबर कांद्याला २४०० ते २९५०, तीन नंबर कांद्याला १७०० ते २३५०, गोल्टी कांद्याला २६०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.