बाजारभाव

हवामानाचा फटका बसल्याने कडधान्यांच्या उत्पन्नात घट ! असे आहेत बाजारभाव

Ahmednagar News : यंदा पाऊस लांबल्याने लागवड घटली, तसेच अवकाळी पावसाचाही मोठा फटका बसल्याने सर्वच कडधान्यांचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत असून, त्यातच परत किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खूपच कमी झाले आहे.

त्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. रोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेल्या कडधान्यांसह डाळींचे भाव कडाडले आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्ये घेतली जातात.

तसेच राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांतूनदेखील डाळींचा पुरवठा होतो. मात्र यंदा परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. हातातोंडाशी आलेले कडधान्याचे पीक आडवे झाले. डिसेंबरमध्ये नवीन डाळींचे उत्पादन बाजारपेठेत येऊ शकले नाही.

त्यामुळे बाजारपेठेत डाळींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी वाढली असून पुरवठा घटला आहे. सध्या बाजारात तूर, मूग, उडिद यांना चांगले दर मिळत आहेत.

अहमदनगर बाजार समितीत मिळालेले दर: ज्वारी ३६०० ५५००, बाजरी २४०० – २८५०, तूर ७५०० – ९०००, हरभरा ४६०० – ५२००, मुग ५३०० – ९०००, उडिद ५००० – ८१००, कुलथी ७००० – १६५००, धना ५५००, मिरची ७५०० – १९४००, गहू २५०० ३५००, एरंडी ५१००, राजमा ५०००, सोयाबीन ४५०० – ४७००, मका २००० – २२४००.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts