बाजारभाव

Gold Offer : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याआधी ‘या’ ४ बंपर ऑफर जाणून घ्या; मोठा फायदा होईल

Gold Offer : सोने खरेदीदार (Gold buyers) जास्त प्रमाणात शुभ मुहूर्त पाहून दागदागिने (Jewelry) खरेदी करत असतात, मात्र अशा वेळी त्यांना खरेदीसंबंधी ऑफरची माहिती नसल्याने ते लाभ घेऊ शकत नाहीत.

मात्र आता तुम्ही अक्षय्य तृतीयेला (Akshayya Tritiye) स्वस्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe ने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अॅपद्वारे सोने आणि चांदीच्या खरेदीवर ऑफर जाहीर केली आहे. वापरकर्ते अॅपद्वारे ९९९ शुद्धतेचे सोने खरेदी करू शकतात आणि ते बँक ग्रेड विमा (Bank grade insurance) लॉकरमध्ये जमा करू शकतात.

कोणतेही स्टोरेज किंवा मेकिंग शुल्क नाही

यावर कोणतेही स्टोरेज किंवा मेकिंग चार्ज नाही (No storage or making charge). याशिवाय, डिझाईन पर्यायांच्या विस्तृत श्रेणीतून सोन्याची नाणी किंवा बारच्या स्वरूपात डिलिव्हरी देखील मिळू शकते. कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे की, “फोनपेवर २४ कॅरेट सोने आणि चांदी सर्वोत्तम मूल्य आणि सर्वाधिक 99.99 टक्के शुद्धतेसह उपलब्ध आहे.

रु.२,५०० पर्यंत कॅशबॅक

ऑफर कालावधी दरम्यान वापरकर्ते त्यांच्या सोने खरेदीवर रु.२,५०० पर्यंत कॅशबॅक घेऊ शकतात. चांदीची नाणी किंवा बार खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना २५० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. ही ऑफर मर्यादित कालावधी ३ मे पर्यंत वैध असेल.

कंपनीने म्हटले आहे की ती MMTC PAMP आणि SafeGold या दोन्ही डिजिटल गोल्ड स्पेसमधील आघाडीच्या खेळाडूंकडून सर्वोच्च शुद्धतेचे सोने ऑफर करते.

सर्वोच्च शुद्धता असलेली चांदीची नाणी आणि बार ऑफर करण्यासाठी त्यांनी सेफगोल्डशी विशेष करार केला आहे. अक्षय तृतीयेच्या आसपास डिझाइन केलेली उच्च दर्जाची सोन्या-चांदीची नाणी आणि बारसाठी घरपोच विमा उतरवणे देखील ग्राहक निवडू शकतात.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts