Gold Price Today : लग्नसराईच्या दिवसांमध्ये दागदागिने (Jewelry) खरेदी करण्याकडे ग्राहकांचा (customers) विशेष कल असतो. अशा वेळी दिल्ली सराफा बाजारात (bullion market) शुक्रवारी सोन्याचा भाव 436 रुपयांनी घसरून 50,551 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 50,987 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. मात्र, चांदीचा भाव 233 रुपयांनी वाढून 56,750 रुपये किलो झाला आहे.
गेल्या व्यापार सत्रात चांदी 56,517 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) सोन्याचा भाव 1,743 डॉलर प्रति औंस होता. तर चांदीचा भाव 19.36 डॉलर प्रति औंसवर स्थिर होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज कॉमेक्सवर स्पॉट गोल्ड 0.26 टक्क्यांनी वाढून 1,743 डॉलर प्रति औंस झाला आहे.
फ्युचर्स ट्रेडमधील किंमती
फ्युचर्स ट्रेडमध्ये गुरुवारी सोन्याचा भाव 151 रुपयांनी वाढून 50,651 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, ऑगस्ट डिलिव्हरीसाठीचे करार 151 रुपये किंवा 0.3 टक्क्यांनी वाढून 50,651 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होते. हे 9,796 लॉटच्या व्यवसायाच्या उलाढालीसाठी आहे.
दुसरीकडे, गुरुवारी वायदे व्यवहारात चांदीचा भाव 282 रुपयांनी वाढून 57,008 रुपये किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सप्टेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 282 रुपये किंवा 0.5 टक्क्यांनी वाढून 57,008 रुपये प्रति किलोवर पोहोचला. या किमती 21,388 लॉटच्या व्यवसायिक उलाढालीत आहेत.
मुंबईत सोन्या-चांदीचा भाव
त्याचवेळी देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबई (Mumbai) महानगरात सोन्याचा भाव 50,679 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत चांदीचा भाव 56,881 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
रशिया आणि युक्रेनमधील तणाव, जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी आणि उच्च महागाईमुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. या अहवालात तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव यंदा ५५,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे पुढील वर्षी सोने 62,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
सोन्याच्या दरात सध्या अस्थिरता असली तरी भाव 50 हजारांच्या वरच आहेत. महामारीच्या काळात सोन्याने ५६ हजारांचा टप्पा ओलांडला होता. जी 7 देशांनी रशियातून सोन्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने येत्या काळात किमती वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी (Expert) व्यक्त केली आहे.