Gold Price Today : १ जुलैपासून सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 10.75 टक्क्यांवरून १५ टक्के केले आहे. तसे पाहता रुपयाची घसरण (Falling) आणि चालू खात्यातील वाढती तूट (CAD) थांबवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मे महिन्यात सोन्याची आयात २३ अब्ज डॉलरवर पोहोचली, त्यामुळे रुपयावर दबाव वाढत असून १ जुलै रोजी तो डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर गेला. नवीन आयात शुल्क ३० जूनपासून लागू झाले आहे.
तज्ज्ञांचे (experts) म्हणणे आहे की, भारत आपल्या गरजांसाठी सोन्याच्या आयातीवर पूर्णपणे अवलंबून असल्याने, आयात शुल्कात वाढ (Increase in import duty) झाल्याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही (bullion market) होईल आणि लवकरच त्याच्या किमती 2,000 रुपये प्रति १० ग्रॅमने वाढू शकतात. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या लोकांसाठी आता सोने खरेदी करणे अधिक महाग होणार असून त्याचाही मागणीवर परिणाम होणार आहे.
एकूण कर १८.४५ टक्के झाला आहे
सोन्यावरील आयात शुल्कात वाढ झाल्याने त्यावरील एकूण कर १८.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. वास्तविक, आतापर्यंत सोन्यावरील मूळ आयात शुल्क 7.5 टक्के होते, ते ५ टक्क्यांनी वाढवून 12.5 टक्के करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, 2.5 टक्के कृषी पायाभूत उपकर देखील लागू केला जातो, ज्यामुळे प्रभावी सीमा शुल्क १५ टक्के होते. यामध्ये, 0.45 टक्के निव्वळ शुल्क आकारले जाते, याशिवाय 3 टक्के जीएसटी देखील सोन्यावर लावला जातो, ज्यामुळे त्याचा एकूण कर 18.45 टक्के होतो.
मे महिन्यात आयात दीड पटीने वाढली
मे महिन्यात देशातील सोन्याच्या आयातीत दीड पटीने वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मे महिन्यात सोन्याची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५६ टक्क्यांनी वाढली.
तर त्यावरचा खर्च ६७७ टक्क्यांनी वाढून ५.८३ अब्ज डॉलर झाला. यामुळेच एमसीएक्सवर सोन्याचा भाव २.५० टक्क्यांनी वाढताना दिसत होता, तर जागतिक बाजारात ते १८०० डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आले होते.
अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यात एकूण १०७ टन सोने आयात करण्यात आले होते, जे जूनमध्येही वेगाने वाढत आहे. अधिक आयातीमुळे चालू खात्यातील तुटीवर दबाव वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात जीडीपीच्या 1.2 टक्के होती, जी चालू आर्थिक वर्षात जीडीपीच्या 2.9 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.