Gold Rate Information:- सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून सोने चांदीच्या बाजारभावामध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसून येत आहे व काही वेळा थोडीफार घसरन देखील बघायला मिळत आहे. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी समजली जाते व त्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्याला पसंती देतात.
तसेच दागिने म्हणून देखील भारतामध्ये महिला वर्गाकडून सोन्याला सगळ्यात जास्त मागणी असते त्यामुळे भारतात सोन्याची मोठी बाजारपेठ आहे. असे म्हटले जाते की सोन्याचे बाजार भाव दिवसात काही तासात देखील चढतात किंवा उतरतात. परंतु नेमके सोन्याचे भाव हे ठरतात तरी कसे किंवा भारतात सोन्याची मागणी तेवढा पुरवठा कशा पद्धतीने होतो.
भारतामध्ये सोन्याचा तेवढा साठा आहे का किंवा आपल्याला सोने आयात करावे लागते या व इतर सर्व बाबींचा परिणाम आज सोन्याच्या बाजारभावावर होत असतो. या अनुषंगाने सोन्याच्या बाजारपेठेबद्दल किंवा सोन्याबद्दल आपण काही महत्त्वाच्या परंतु तेवढ्यात सर्वसामान्यांसाठी माहितीपूर्ण अशा काही गोष्टी समजून घेणार आहोत.
सोन्याचे मार्केट आणि सोने याबद्दल महत्त्वाची माहिती
1- तोळा म्हणजे काय?- साधारणपणे आपल्याला माहित आहे की सोन्याच्या संबंधित ग्रॅम आणि तोळा शब्द प्रामुख्याने वापरली जातात. जुन्या काळाचा जर विचार केला तर सोने ही एक अगोदर पासून खूप मौल्यवान आणि दुर्मिळ अशी वस्तू आहे. त्यामुळे त्याचे मूल्य खूप जास्त आहे. प्राचीन काळामध्ये एक तोळा सोने म्हणजेच बारा ग्रॅम असे साधारणपणे गणित होते. परंतु आता त्यामध्ये काळानुसार बदल करण्यात आला असून एक तोळा सोने म्हणजे आता 11.66 ग्राम इतके होते. कालांतराने यामध्ये देखील थोडा बदल करण्यात आला व आजकाल बहुतेक देशांमध्ये एक तोळा म्हणजेच दहा ग्रॅम असं साधारणपणे गणित आहे.
2- शुद्ध सोने ही संकल्पना नेमकी काय आहे?- सोन्यामध्ये आपल्याला 24 तसेच 22 तसेच 18 कॅरेट असे प्रकार येतात.यामध्ये सोन्याची शुद्धता दर्शवलेली असते. उदाहरणच घ्यायचे 24 कॅरेट सोन्याची शुद्धता पाहिली तर ती 99.9% दर्शवते. त्या खालोखाल 22 कॅरेटचे सोने हे 91% पर्यंत शुद्ध आहे असे समजले जाते. 22 कॅरेट सोन्यामध्ये नऊ टक्के इतर धातूंचा वापर केलेला असतो. प्रामुख्याने 22 कॅरेटमध्ये जस्त आणि तांबे यांचा वापर केला जातो.
3- सोन्याचे दागिने बनवण्यासाठीचा चार्ज म्हणजे काय किंवा मेकिंग चार्ज कशाला म्हणतात?- सोन्याचे दागिने जेव्हा सोनार बनवतात किंवा सोन्याचे दागिने ज्या ठिकाणी बनवले जातात त्यासाठी कष्ट लागतात. तसेच यावर काही रत्नांचे काम देखील केले जाते. साधारण सोनाराकडून दागिने बनवताना जो काही काम करायला वेळ लागतो किंवा कष्ट लागतात त्यावर ते सोने बनवण्यासाठी चार्ज म्हणजेच मेकिंग चार्ज लावतात. मेकिंग चार्ज जास्त असतो. मेकिंग चार्ज ठरवताना प्रामुख्याने लागणारा वेळ तसेच कष्ट आणि रत्नांची गुणवत्ता याचा प्रामुख्याने विचार केला जातो. साधारणपणे पाच टक्क्यांपासून ते 20 ते 25 टक्क्यांपर्यंत देखील मेकिंग चार्ज लावला जातो.
अशा पद्धतीने ठरतात सोन्याच्या किमती
सोन्याच्या किमतींवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय मार्केटचा विचार केला तर सोन्याचे किमती या आंतरराष्ट्रीय पातळीवर लंडनमध्ये ठरतात. सोन्याचे किंमत ठरवण्यामागे देखील एक इतिहास असून सोन्याची किंमत सगळ्यात अगोदर 1919 यावर्षी निश्चित करण्यात आली होती.साधारणपणे 2015 अगोदर लंडन गोल्ड फिक्स ही सोन्याची नियामक संस्था होती व तिच्या माध्यमातून सोन्याच्या किमती ठरत होत्या.
परंतु 20 मार्च 2015 नंतर लंडन बुलियन मार्केट असोसिएशन ही संस्था उभारण्यात आली. आयसीई प्रशासकीय बेंच मार्क माध्यमातून हे चालवले जाते. याच आयसीईने 1919 मध्ये लंडन गोल्ड फिक्स युनिटची जागा घेतली. या संस्थेच्या माध्यमातून जगातील सर्व देशांचे सरकारांसोबत या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील संघटनांच्या मदतीने सोन्याचा भाव काय असावा हे ठरवते.
जर आपण सध्या सोन्याच्या मार्केटचा विचार केला तर लंडनच्या वेळेनुसार दिवसातून दोनदा सकाळी साडे दहा ते दुपारी तीन वाजता सोन्याचे भाव निश्चित केले जातात.सोन्याचे दर प्रामुख्याने डॉलर्स तसेच पाऊंड आणि युरो या चलनामध्ये निश्चित होतात. सोन्याच्या दरावर महागाई तसेच सरकारचा सोन्याचा साठा किती आहे तसेच जागतिक मागणी किंवा जागतिक ट्रेंड, व्याजाचा दर आणि दागिन्यांची बाजारपेठ इत्यादींचा परिणाम होतो.
अशा पद्धतीने एकंदरीत सोन्याचे मार्केट व सोन्याचे भाव हे ठरत असतात.