बाजारभाव

Gold-Silver Rate: दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज मात्र सोन्याच्या भावात ‘इतकी’ वाढ! वाचा आजचे सोने व चांदीचे दर

Gold-Silver Rate:- मागील सलग दोन दिवसांचा विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचे आपल्याला दिसून आले होते. परंतु गुरुवारी म्हणजेच आज सोन्याच्या भावात किंचित वाढ झाल्याची स्थिती आहे. सोमवारी सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले होते व त्यानंतर मात्र मंगळवार आणि बुधवारी सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली.

आज मात्र 24 कॅरेट सोन्याचा दर पाहिला तर त्यामागे शंभर रुपयांची वाढ दिसून येत असून आज सोन्याचे भाव 63 हजार रुपयाच्या खाली आहेत. एवढेच नाही तर चांदीच्या दरात झालेली घसरण मात्र कायम आहे. चांदीच्या भावाने 80 हजार रुपये प्रति किलोचा भाव पार केला होता. परंतु आज चांदीचे प्रति किलोचे भाव 77 हजार दोनशे रुपयांवर आहेत. काल चांदीचे भाव हे 78 हजार दोनशे रुपये होते.

 बुलियन मार्केट वेबसाईट नुसार आजचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे भाव

जर आपण बुलियन मार्केट वेबसाईटचा विचार केला तर आज महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव पुढील प्रमाणे होते.

1- मुंबई मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्राम 57,154 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 62 हजार 350 रुपये प्रति दहा ग्राम आहे.

2- पुणे पुणे या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमची किंमत आज 57 हजार 154 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62 हजार 350 रुपये असेल.

3- नागपूर नागपूर या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर 57,154 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62 हजार 350 रुपये असेल.

4- नासिक नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,154 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62 हजार 350 रुपये प्रति दहा ग्राम आहे.

 या एप्लीकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना सोन्याची शुद्धता तपासता येते

सोन्याची शुद्धता तपासायचे असेल तर एक ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेले असून त्याचे नाव बीआयएस केअर ॲप असे आहे. या एप्लीकेशनच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. एवढेच नाही तर ग्राहक सोन्यासंबंधी काही तक्रार असेल तर ती सुद्धा या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नोंदवू शकतात.

वस्तूचा परवाना तसेच नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्यास ग्राहक एप्लीकेशनच्या माध्यमातून त्याबद्दल तक्रार करू शकतात.

Ajay Patil

Recent Posts