बाजारभाव

Kapus Bajarbhav : मोठी बातमी ! कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ ; ‘या’ ठिकाणी कापसाला मिळाला 10 हजाराचा दर, वाचा सविस्तर

Kapus Bajarbhav : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कापसाच्या बाजारभावात आता थोडी वाढ पाहायला मिळत आहे. मित्रांनो महाराष्ट्रात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कापसाची शेती प्रामुख्याने खानदेश विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.

जालना जिल्ह्यातही कापूस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. आता जालना जिल्ह्यातूनच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. मित्रांनो जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यात खाजगी कापूस खरेदीचा शुभारंभ झाला आहे. तालुक्यातील टेंभुर्णी येथे खाजगी कापूस खरेदी सुरू झाली आहे.

खाजगी कापूस खरेदी मध्ये कापसाला चांगला उच्चांकी बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे टेंभुर्णी व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. मित्रांनो खाजगी लिलावाच्या मुहूर्ताच्या कापसाला तब्बल 9,111 रुपय प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला आहे. मित्रांनो सध्या टेंभुर्णी समवेतच परिसरात कापूस वेचणी प्रगतीपथावर आहे.

अशा परिस्थितीत आता खाजगी व्यापाऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे. विशेष म्हणजे खाजगी खरेदीमध्ये शेतकरी बांधवांना अधिक दर मिळत आहे. दरम्यान, जाणकार लोकांनी देखील शेतकरी बांधवांना नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढी दरपातळी लक्षात घेऊन कापसाची विक्री करावी असा सल्ला जारी केला आहे. निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी बाजारपेठेचा आढावा घेत कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहणे त्यांच्यासाठी उपयोगाचे ठरणार आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागात कापूस वेचणी अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक शेतकरी बांधवांनी दोन ते तीन कापूस वेचण्या केल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी कापूस वेचणी झाल्यानंतर लगेचच पऱ्हाट्या शेताबाहेर जाळून नष्ट कराव्यात. म्हणजे शेतकरी बांधवांनी फरदड कापसाचे उत्पादन घेऊ नये असा सल्ला जाणकार लोकांकडून देण्यात आला आहे.

कृषी विभागाने देखील कापसाचे फरदड उत्पादन घेऊ नये असे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. दरम्यान कापसाला चांगला बाजार भाव मिळाला म्हणजे शेतकरी बांधव कापसाचे फरदड उत्पादन घेतो. मात्र शेतकऱ्यांनी मोह आवरून कापसाचे फरदड उत्पादन घेणे टाळावे. कापसाचे फडदड उत्पादन घेतल्यास येत्या हंगामात गुलाबी बोंड अळीचे सावट पिकावर राहते. फरदड उत्पादनामुळे गुलाबी बोंड आळी साठी पोषक वातावरण तयार होते. यामुळे शेतकरी बांधवांनी फरदड कापसाचे उत्पादन घेणे टाळावे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts