बाजारभाव

आता दलाल नाही तर शेतकरीच ठरवणार कांद्याचे भाव ! सरकारच्या परवानगीशिवाय कुठेही पाठवू शकतील माल

Onion News : कांद्याचे बाजारभाव ही एक मोठी समस्या आपल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांसमोर आहे. कांदा हे नगदी पीक आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून कवडीमोलाने त्याची विक्री सुरु आहे. त्यात जर भाव वाढले तर दलाल लिलाव पाडतात तर कधी

सरकार निर्यात शुल्क वाढवून भाव नियंत्रणात आणते. त्यामुळे कष्टाने उत्पादित केलेला कांदा कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. परंतु आता शेतकरी यातून बाहेर येतील. आता दलाल नाही तर शेतकरीच कांद्याचे भाव ठरवतील.

सरकारच्या परवानगीशिवाय कुठेही कांदा पाठवू शकतील. यासाठी राज्य कांदा उत्पादक संघटनेने शेतकरी कांदा विक्री केंद्र उपक्रम हाती घेतला आहे. पुणे येथून या उपक्रमाला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.

* नेमके कशा पद्धतीने असेल स्वरूप

शेतकरी स्वतः या केंद्रात येऊन कांदा विक्री करेल. त्यास वेळ नसेल तर मदतीला शेतकऱ्यांचीच मुले केंद्रात उपलब्ध असतील. त्यांनाही रोजगार मिळेल. कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेतकरी कंपन्या, पणन यांच्याकडे शेतकरी कांदा विक्रीसाठी आणणार नाही. संघटनेच्या केंद्रातून व्यापारी,

नियातदार, किरकोळ विक्रेते यांना कांदा घ्यावा लागेल. शेतकरी सांगेल त्या भावात कांदा खरेदी करावा लागेल. प्रतवारीसह कांदा उपलब्ध ठेवण्याची व्यवस्थाही केंद्रात असणार आहे. त्यामुळे येथे व्यापाऱ्यांची मनमानी चालणार नाही. शेतकऱ्यांना हवा तो भाव याठिकाणी उपलब्ध होईल.

* कोठे असणार केंद्रे

पुणे येथील मार्केटमध्ये प्रथम कांदा विक्री केंद्राची सुरवात होईल. मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूर, ठाणे, भिवंडी, छत्रपती संभाजीनगर, उल्हासनगर, वसई, पनवेल या शहरांत टप्याटप्याने कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात येईल. त्यानंतर राज्याच्या दृष्टीने विचार केला जाईल असे दिघोळे म्हणाले आहेत.

* सरकारी परवानगीशिवाय कुठेही विक्री करा शेतीमाल

भारत दिघोळे यांनी यावेळी माहिती दिली की, शेतकरी कांदा विक्री केंद्र कांदा उत्पादक संघटनेच्या नियंत्रणातून सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे शेतकरी पिकवलेला शेतीमाल कुठेही विकू शकतो. त्यास सरकारच्या परवानगीची गरज नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: onion news

Recent Posts