बाजारभाव

बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर कांदा निर्यात मंदावली; महाराष्ट्रातील बाजारात काय भाव मिळतोय ? बाजारभाव पडलेत का ? पहा….

Onion Rate Maharashtra : सध्या बांग्लादेशात मोठा हाहाकार सुरू आहे. यामुळे बांग्लादेशाची सध्या संपूर्ण जगात चर्चा आहे. बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा संपूर्ण जगावर परिणाम पाहायला मिळत आहे. या घटनेचा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण की बांग्लादेशात भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मक्याची निर्यात होत असते. आता तिथे राजकीय अस्थिरता आली असल्याने, सर्व सूत्रे लष्कराच्या हाती आली असल्याने निर्यात मंदावली आहे.

पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्या देश सोडून गेल्या आहेत. विशेष म्हणजे शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतरही तेथील परिस्थिती ही पूर्वपदावर आलेली नाही. अजूनही बांग्लादेश पेटलेलाच आहे. यामुळे जोपर्यंत तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत कांदा आणि मक्याची निर्यात मंदावणार आहे.

अशा परिस्थितीत कांद्याच्या बाजारभावात घसरण होण्याची भीती देखील अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत आज आपण बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर महाराष्ट्रातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यातील बाजारात कांद्याला काय भाव मिळाला

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : पारनेर एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3300 आणि सरासरी 2600 असा दर मिळाला आहे.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1700, कमाल 3326 आणि सरासरी 3,050 असा दर मिळाला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3400 आणि सरासरी 2950 असा भाव मिळाला आहे.

कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1400, कमाल 3425 अन सरासरी 2901 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

लासलगाव विंचुर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1100, कमाल 3151 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला आहे.

लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 3252 आणि सरासरी 3100 प्रती क्विंटल असा भाव मिळाला आहे.

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान एक हजार, कमाल 3133 आणि सरासरी 2950 असा भाव मिळाला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1400, कमाल 3000 आणि सरासरी 2200 असा भाव मिळाला आहे.

कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 3500, कमाल 4500 आणि सरासरी चार हजाराचा भाव मिळाला आहे.

अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 3200, कमाल 4000 आणि सरासरी 3600 रुपये असा भाव मिळाला आहे.

साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज लाल कांद्याला किमान एक हजार 940, कमाल 3125 आणि सरासरी 2900 रुपये असा भाव मिळाला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज लाल कांद्याला किमान 300, कमाल 3300 आणि सरासरी 2400 असा भाव मिळाला आहे.

मुंबई कांदा बटाटा मार्केट : या बाजारात आज कांद्याला किमान 2500, कमाल 3100 आणि सरासरी 2800 असा भाव मिळाला आहे.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : कोल्हापूर एपीएमसी मध्ये आज कांद्याला किमान 1000, कमाल 3100 आणि सरासरी 2200 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts