Onion Rate : बांगलादेशात उद्भवलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे भारतीय शेतकरी चिंतेत सापडले आहेत. याचे कारण म्हणजे बांगलादेश हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मका आयात करतो. मात्र बांगलादेशात सुरू असणाऱ्या हिंसाचारामुळे आणि झालेल्या सत्ता परिवर्तनामुळे कांदा आणि मका निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसणार अशी भीती व्यक्त होत आहेत.
मात्र असे असले तरी बांगलादेशातील हिंसाचाराचा अजून तरी राज्यातील कांद्याच्या बाजारभावावर विपरीत परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे. उलटपक्षी काल झालेल्या लिलावात राज्यातील एका महत्त्वाच्या बाजारात कांद्याला तब्बल 5000 चा भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या समाधानाचे वातावरण आहे.
काल अचानक कांद्याच्या बाजारभावात चांगली सुधारणा झाली असून शेतकरी बांधव समाधान व्यक्त करत आहेत. तथापि शेतकऱ्यांनी कांदा निर्यातीसाठी लागू करण्यात आलेले किमान निर्यात मुल्य आणि 40% कांदा निर्यात शुल्क सरकारने काढून टाकावे अशी आग्रही मागणी केली आहे.
यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकारी या संदर्भात काही सकारात्मक निर्णय घेणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र कांदा निर्यातीसाठी जाचक अटी असतानाही देशांतर्गत कांदा बाजारभावात सुधारणा होत आहे. दरम्यान आता आपण राज्यातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळतं आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कुठे मिळाला विक्रमी दर ?
काल विदर्भातील चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान 3000, कमाल 5000 आणि सरासरी 4000 असा विक्रमी दर मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती प्राप्त झाली आहे.
राज्यातील इतर बाजारांमधील भाव
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याला किमान 2300, कमाल 3000 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 800 कमाल 3500 आणि सरासरी 2650 असा भाव मिळाला आहे.
पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1700, कमाल 2900 आणि सरासरी 2300 असा भाव मिळाला आहे.
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान दोन हजार कमाल 3000 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान दोन हजार, कमाल 3000 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1800, कमाल 3651 आणि सरासरी 3450 असा दर मिळाला आहे.