Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) दरवाढीमुळे लोक चिंतेत होते. यामुळे सर्वसामान्यांना वाहने चालवणे अवघड झाले होते. मात्र आता कच्च्या तेलाच्या किमतीतही (crude oil prices) मोठी घसरण (decline) पाहायला मिळत आहे.
तेलाच्या किमती खाली येऊ शकतात
गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर त्याच ठिकाणी कायम आहेत. यामध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. सरकारने (government) 21 मे रोजी उत्पादन शुल्कात (excise duty) कपात केली होती. कच्च्या तेलाच्या किमतीत ज्या प्रकारे नरमाई दिसून येत आहे, त्यामुळे तेलाच्या किमती खाली येतील, अशी शक्यता अनेक माध्यमांतून व्यक्त केली जात आहे.
कच्चे तेल नवीनतम दर
कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर जात आहे. सोमवारी, WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 102 वर पोहोचली. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 105 डॉलरवर दिसले.
सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काही राज्यांनी व्हॅटही कमी केला. सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलचे दर आठ रुपयांनी तर डिझेलचे दर सहा रुपयांनी कमी झाले आहेत.
आजचे भाव काय आहेत? (पेट्रोल-डिझेलचे दर १९ जुलै रोजी)
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
याप्रमाणे तुमच्या शहराचे दर जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर तपासण्यासाठी तेल कंपन्या एसएमएसद्वारे दर तपासण्याची सुविधा देतात. दर तपासण्यासाठी, इंडियन ऑइलच्या (IOC) ग्राहकाला RSP लिहून ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> आणि BPCL ग्राहक RSP <डीलर कोड> 9223112222 वर एसएमएस करा.